नांदगाव पेठ (Amaravti Election Results) : ४ जून रोजी अमरावती लोकसभेच्या निकालानंतर (Election Results) येथील शासकीय वसाहत मध्ये विशिष्ट समाजातील तरुणांनी विजयोत्सव साजरा करत डीजेच्या तालावर हुडदंग घातला. अश्लील हातवारे करीत ईतर समाजात तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याचे विडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने शुक्रवारी भाजपच्या वतीने (Nandgaon Peth police) नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल करून दोषी युवकांवर कार्यवाही करण्याचीमागणी यावेळी करण्यात आली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक (Amaravti Election) पार पडल्यानंतर ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागला.काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव करून विजयश्री मिळविला. बळवंत वानखडे यांच्या विजयाचा ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र काही विशिष्ट समाजातील तरुणांनी शासकीय वसाहत येथे डीजेच्या तालावर नाचत अश्लील हातवारे केले. तसेच दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला.समाजमाध्यमांवर अश्या कृत्याचे विडिओ व्हायरल झाल्यानंतर गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी (Nandgaon Peth police) नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला जाऊन या प्रकाराची लेखी तक्रार दाखल केली व दोषी तरुणांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निवेदन देतांना भाजपचे अमोल व्यवहारे, सचिन इंगळे, ऍड. निलेश मारोडकर, प्रवीण जामोदकर, अनिल हिवे यांचेसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.