अमरावती (Amravati) :- ७ ऑगस्ट जागतिक हातमाग दिवसाच्या (World Handloom Day) निमित्याने सन्माननीय श्री .नरेंद्रजी मोदी (Narendraji Modi) यांच्या प्रेरणे नुसार व भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार तसेच भाजपा(BJP) शहर अध्यक्ष प्रवीण भाऊ पोटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती येथील तपोवन कुष्ठधाम येथील कुष्ठ भगिनींनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्री केंद्राला भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी भेट दिली तसेच कुष्ठभगिनींनी हाताने तयार केलेल्या विविध वस्तू उदाहरणार्थ टॉवेल, चादर, चपला, स्टोल, पायपोस ,दुपट्टा, रुमाल, नॅपकिन खरेदी करून कुष्ठ भगिनी नलिनी वेलकर व गायत्री पटेल यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष गंगाताई खारकर व भाजपा महिला मोर्चा महामंत्री व या हातमाग दिवसाच्या संयोजिका सौ सुरेखा ताई लुंगारे तसेच सहसंयोजिका श्रद्धाताई गहलोत यांनी केला.
कलाकृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा केला संकल्प
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुरेखाताईंनी कार्यक्रमा मागची भूमिका विशद करत ज्यांच्या हाताला बोटे नाहीत त्यांनी इतकी सुंदर कलाकृती चे निर्माण केले ती कलाकृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प केला.तर तपोवन बद्दल संपूर्ण माहिती तपोवनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष गवई यांनी दिली. तर अध्यक्षीय भाषणामध्ये सौ गंगा खारकर यांनी कुष्ठभगिनींचे कौतुक करत आमच्याकडून जी काही मदत करता येईल ती निश्चितपणाने आम्ही करू असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन हातमाग दिवसाच्या सहसंयोजिका तथा भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष श्रद्धा ताई गहलोत यांनी केले .तर आभार भाजपा महिला मोर्चा महामंत्री शितल वाघमारे यांनी मानले. याप्रसंगी व्यासपीठावर तपोवन चे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष गवई, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष गंगा ताई खारकर ,महामंत्री सुरेखाताई लुंगारे महामंत्री शितल वाघमारे उपाध्यक्ष श्रद्धा गेहलोत,किरण देशपांडे, भारती गुहे ,मेघा हिंगासपुरे,संगिता तोंडे, लता खेडकर, आशा चावला, कोमल आहुजा, माला दळवी, सीमा बत्रा,पदमा खेडकर, आधी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.




 
			 
		

