ग्रामीण सह शहरातही अनेकांना गंडविले, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अमरावती (Amravati Police) : पोलीस असल्याची बतावणी करून नागरीकांना लुबाडणारी कुख्यात ईराणी टोळी गजाआड झाली आहे. ही कारवाई ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. या टोळीने (Amravati Police) अमरावतीसह संपूर्ण राज्य व अनेक राज्यात अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मागील काही दिवसात अमरावती ग्रामिण (Amravati Police) व लगतचे काही जिल्हयात नागरीकांना रस्त्याने जात असतांना अडवुन स्वतः पोलीस असल्याचे तसेच रस्त्याने पुढे दरोडा, खुन यासारखा गंभिर गुन्हा घडला असल्यांची खोटी बतावणी करून सुरक्षीततेच्या दृष्टीने नागरीकांचे अंगावर असलेले मोल्यवान दाग-दागीने काढून खिश्यात किवा सोबत असलेल्या पिशवीत ठेवण्याबाबत सांगण्यात येत होते. त्यानंतर नागरीकांचे दाग-दागीने त्यांच्या खिशात किंवा पिशवीत ठेवत असतांना हातचलाखी करून नागरीकांना विशेषतः जेष्ठ नागरीकांना लुबाडणुकीच्या घटना घडलेल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील (Amravati Police) तळेगांव, वरूड, मोशी, तिवसा, परतवाडा येथे अश्याच पध्दतीने गुन्हे घडलेले आहेत. तळेगांव हद्दीत ५ तारखेला अरूण लक्षण गोरे, वय (६८, रा. यवतमाळ) हे त्यांचे पत्नीसह त्यांचे दुचाकीने बाबुळगांव, जि. यवतमाळ ते देवगांव, जि. अमरावती रोडने जात असतांना बुलेटवर आलेल्या २ अज्ञात इसमांनी त्यांना थांबवुन स्वतः पोलीस असल्याचे तसेच रस्त्याने पुढे खुन झाला असून सुरक्षीततेच्यादृष्टीने अंगावर असलेली सोन्याची पोत. गोफ, मंगळसुत्र व हातातील अंगठी असे एकुण ७४ ग्रॅमचे सोन्याचे दागीने काढून सोबत असलेल्या पिशवी ठेवण्याबाबत सांगीतले व सदरचे दागीने पिशवित ठेवत असतांना हातचालाखी करून घेवून पळुन गेले, फिर्यादीचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पो.स्टे.ला येवून रितसर तक्रार दिली असता, गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्याच दिवशी सदर घटनेनंतर काही तासांचे अंतरात अश्या प्रकारची घटना पो.स्टे. वरूड हद्दीत सुध्दा घडली असुन त्याबाबत सुध्दा पो.स्टे. वरूड येथे गुन्हयाची नोंद करण्यात आलेली आहे.
तोतया पोलिसांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला असताना स्थानिक गुन्हे शाखेने इराणी टोळीचा मागोवा घेतला. तळेगाव व वरुड येथील दोन्ही घटनेत आरोपीनी वापरलेले वाहन व आरोपी हे एकच असल्याचे प्राथमिक स्तरावर सी.सी.टी.व्ही. फुटेज व फिर्यादी यांनी सांगीतलेले आरोपींचे वर्णन यावरून निष्पन्न झाले होते.
यानंतर पोलिसांनी (Amravati Police) या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासामध्ये बिड जिल्हयातील परळी येथील सराईत गुन्हेगार इराणी जहीर अब्बास ऊर्फ मोटा हा त्याचे साथीदारांसह मिळुन अश्याप्रकारचे गुन्हे करित असल्याचे व त्यानेच त्याचे इतर साथीदारांसह अमरावती ग्रामिण घटकातील वरील दोन्ही गुन्हे केले असल्याची माहीती प्राप्त झाली होती.
सदर आरोपीचा पोलीस (Amravati Police) शोध घेत होते. परंतु सदर आरोपी हे वेळोवेळी त्यांचे वास्तव्याचे ठिकाण बदलवीत होता. शुक्रवारी रात्री आरोपी इराणी जहीर अब्बास ऊर्फ मोटा हा त्याचे साथीदारासह चारचाकी वाहनाने नागपुर वरून परळो, जि.बिड करिता जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने देवगाव येथे नाकाबंदी केली.
यावेळी पुलगांवच्या दिशेने येणारी पांढ-या रंगाची विना क्रमांकाची एस.यु.व्ही. चारचाकी थांबवून तपासणी केली असता सदर वाहनात आरोपी इराणी जहीर अब्बास ऊर्फ मोटा अब्बास शेकु अली (वय ४० वर्षे, रा. शिवाजी नगर, परळ बेजनाथ, जि.बिड), लाला ऊर्फ गांधी समीर शेख (वय ४८ वर्ष रा. इंदोरा नगर, आंबेवली जि. ठाणे), वसीम शब्बीर ईराणी ( २५ वर्ष रा. बिरर, कर्नाटक) व नझीर हुसेन अजीज अली ( ५२ वर्ष रा. बिरर, कर्नाटक) बसले होते. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले व चौकशी सुरू केली.
आरोपींजवळून तळेगाव येथील गुन्हयातील फिर्यादीची फसवणुक करुन नेलेले सोन्याचे दागीणे, गोफ, मंगळसुत्र, पोत, अंगुठी असे एकूण ७७.५ ग्रॅम तसेच वर्ड येथील गुन्हयातील सोन्याची चैन व एक अंगठी असे एकूण ५० ग्रॅम जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर अधीक्षक. पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वातील उपनिरीक्षकसागर हटवार, मुलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार पोहवा बळवंत दाभणे, गजेन्द्र ठाकरे, रविन्द्र बावणे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, पंकज फाटे, सचिन मिश्रा, सागर धापड, शिवा शिरसाट, प्रशिक वानखडे, मनोज ढवळे यांचे पथकाने केली आहे.
अमरावती जिल्ह्यात नऊ गुन्हे
इराणी टोळीच्या सदस्यांनी अमरावती जिल्ह्यात नागरिकांना गंडविण्याचे पाच गुन्हे केले आहेत यामध्ये वरुड ३, मोर्शी १, तिवसा १, परतवाडा १, तळेगाव ३ अशाप्रकारे ९ गुन्हे केले आहेत. आरोपीतांकडून १ चारचाकी वाहन, २ खोटे पोलीस ओळखपत्र, ६ क्राईम प्रेस रिपोर्टर खोटे ओळखपत्र वरील ९ गुन्हयात गेलेले सोन्याचे दागिणे अंदाजे २२१ ग्रॅम असा एकूण २९,००,०००/- रु.चा माल जप्त करण्यात आला आहे.
विविध राज्यात 27 गुन्हे
इराणी टोळीच्या सदस्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये एकूण 27 गुन्हे केले आहेत. यात महाराष्ट्रातील बारा गुन्ह्याची नोंद आहे. यात रायगड-१ नागपुर-१, भंडारा-१, गडचिरोली-१, गोंदीया-१, छ.संभाजी नगर २/सोलापुर-१/अमरावती शहर-२/नांदेड-१, चंन्द्रपुर-१ अशाप्रकारे गुन्हाचा स्ईम्वेष आहे. तसेच तेलगंणा (निझामाबाद १) छत्तीसगड (अंबिकापुर-१), उ.प्र. (मंडी-१), बिहार (गया) असे एकूण २७ गुन्हयांची माहीती दिली आहे. तसेच आरोपीतांनी कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, पश्चिम बंगाल, उडीसा, बिहार ई. राज्यात गुन्हे आणखी काही गुन्हे केले असल्याचे तसेच काही ठिकाणी सदर आरोपी गुन्हयात हवे असल्याची सुध्दा बाब समोर येत आहे या दृष्टीने अधिक माहिती काढण्यात येत आहे. आरोपीतांना पुढील कार्यवाही करिता पो.स्टे. तळेगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
जहीर अब्बास वर बक्षीस
इराणी टोळीतील आरोपी इराणी जहीर अब्बास ऊर्फ मोटा अब्बास शंकु हा पो.स्टे. मंडी, जि. सहारनपुर, उ.प्र. येथील फसवणुकीचा गुन्ह्यात फरार असुन त्याचेवर १५,००० बक्षीस असल्याची माहीती मिळाली आहे शहानिशा करण्यात येते आहे. तसेच आरोपी लाला ऊर्फ गांधी समीर शेख यांचेवर ठाणे पोलीसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केलेली असुन तो सध्या जामीनीवर असुन गुन्हे करित आहे. करिता त्याची जामीन रद्द करण्याबाबत योग्य कारवाई करण्यात येते.
डायल 112 वर संपर्क साधा
अमरावती ग्रामिण घटकातील सर्व नागरीकांनी अशा तोतया पोलिसांच्या (Amravati Police) अफवांना बळी पडू नये असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी म्हटले आहे. पोलीस कधीही कोणत्याही नागरीकांना त्यांची मौल्यवान वस्तु किंवा दागीने स्वतकडे देण्याबाबत सांगत नसतात करिता अश्या आरोपीतांच्या भुलथापांना बळी न पडता असे काही आढळुन आल्यास त्वरीत डायल ११२ किंवा नजीकचे पो.स्टे.ला त्वरीत माहोती देवून सहकार्य करावी असे आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी केले.