अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ
हिंगोली (Anganwadi Sevika Andolan) : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसह इतर अनेक मागण्यांकरीता मुंबईतील आझाद मैदानावर कृती समितीच्यावतीने बेमुदत उपोषण व जेलभरो आंदोलन सुरू होते. याप्रश्नी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ठोस निर्णय घेऊन दोन दिवसाच्या आत जीआर काढण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. (Anganwadi Sevika Andolan) अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅज्युटी या मागण्यांच्या शासकीय निर्णय विना विलंब निर्गमित करण्याच्या मागणीकरीता महाराष्ट्र राज्य व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने यापूर्वी जिल्हा परिषदेवर मोर्चा, धरणे, जेलभरो व अन्नत्याग आंदोलन करून सुद्धा शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नव्हता.
मुंबई आझाद मैदानावर सुरू होते आंदोलन
त्यामुळे २३ सप्टेंबर पासून मुंबईतील आझाद मैदानावर (Anganwadi Sevika Andolan) अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. २५ सप्टेंबरला निदर्शने व जेलभरो आंदोलन होते. त्यापूर्वी ना. आदिती तटकरे यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलाविले. ना. तटकरे (Aditi Tatkare) यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. ज्यामध्ये मंत्रीमंडळाच्या पुढील बैठकीत मानधनवाढीचा जीआर निघेल असे आश्वासन दिले. पेन्शन व गॅज्युटीचे प्रस्ताव अर्थ खात्याकडून त्रुटी असल्यामुळे परत आल्याने त्यातील त्रुटी दुरू करून त्याचाही लवकर जीआर काढला जाईल, असे आश्वासन दिल्याने आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेण्यात आले. या चर्चेमध्ये महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिष्टमंडळात अनेकांचा समावेश
ना. आदिती तटकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान म. रा. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, कमल परूळेकर, जयश्री पाटील, जिवन सुरूडे, दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्षा सिंधूताई ठाकुर, नेताजी धुमाळ यांचा समावेश होता. ना. आदिती तटकरे यांनी (Anganwadi Sevika Andolan) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.