Pandharkawda :- राज्यात मोठा गाजावाजा करुन गो व गोवंश हत्या बंदी कायदा अमलात आणल्या गेल्या. परंतु या कायद्याचा तस्करांना अधिकाधिक फायदा होत आहे. जनावर तस्करांची (animal smuggler) गॅन्ग पुन्हा हायवेवर सक्रीय झाली असुन ’’संदिप’’गॅन्गने हल्लीच हायवेवर एक धाबा सुध्दा भाड्याने घेतल्याचे बोलल्या जात आहे. राज्यात गो व गोवंशाच्या वाहतुकीस बंदी असल्याने त्याचा फायदा तस्कर घेत आहे. हायवेने तेलंगणात जनावरांची वाहने पास करुन देण्याकरीता येथे दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
जनावर तस्करीमध्ये पोलीसांचा सक्रीय सहभाग असल्याचे याआधी सुध्दा उघडकीस आले
काही दिवसाआधी नागपुर येथील काही ट्रान्सपोर्टच्या मालकांनी जनावरांची वाहतुक करणार्यांना खंडणी मागण्यात येत असल्याची तक्रार पांढरकवडा पोलीसात दिली होती. त्यावेळी पांढरकवडा पोलीस स्टेशनमधील (Pandharkawada Police Station) तत्कालीन पोलीस कर्मचारी ’’संदिप’’सह ११ जणांवर पोलीसांनी खंडणीचे गुन्हे दाखल केले होते. त्या प्रकरणाची शाई वाळत नसतांनाच पुन्हा नव्या जोमाने ’’संदिप’’ गॅन्ग हायवेवर जनावरांची वाहने सोडण्याकरीता सक्रीय झाल्याचे बोलल्या जात आहे. त्या गॅन्गला एक समाज बांधव सक्रीय सहकार्य करीत असल्याची चर्चा खुद्द पोलीस विभागात रंगत आहे. त्यामुळे या सहकार्य करणार्या पोलीस कर्मचार्यांचे ’’राज’’ उखलुन काढण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना पेलावे लागणार आहे. जनावर तस्करीमध्ये पोलीसांचा सक्रीय सहभाग असल्याचे याआधी सुध्दा उघडकीस झालेले आहे.
केळापुर तालुका हा अवैद्य धंद्याचे माहेर घर म्हणुन सुप्रसिद्ध आहे
केळापुर तालुका हा अवैद्य धंद्याचे माहेर घर म्हणुन सुप्रसिद्ध आहे. त्यात सर्वाधीक अवैद्य धंदे पाटणबोरीत सुरु आहे. पाटणबोरीतील ’’मोनु’’चा मटका अड्डा तेलंगणामध्ये सुध्दा फेमस आहे. यासह तेथील जुगार अड्ड्याची ख्याती संपुर्ण राज्यात पसरलेली आहे. येथे नवनवे जुगार,मटका तथा जनावर तस्कर उदयास येत आहे. मटका,जुगार व जनावर तस्करांनी हायवेवरच काही धाबे, हॉटेल भाडे तत्वावर घेतलेले आहे. तेथुनच या सर्व अवैद्य धंद्याची व्युहरचना आखण्यात येत असते. मात्र पोलीसांच्या वतीने अशांवर कार्यवाही होतांना दिसुन येत नाही. त्यांच्यावर कार्यवाही न करण्याकरीता मोठे ’’अर्थकारण’’ आडवे येत असल्याचेही बोलल्या जात आहे. काही दिवसाआधीच खंडणीचे गुन्हे दाखल झालेल्या काही तस्करांनी पैकी अनेकांनी जनावरांची वाहने तेलंगणामध्ये पास करण्याकरीता ’’आकाश’’ पातळ एक करुन आपली ’’शक्ती’’ पणाला लावणे सुरु केल्याचे बोलल्या जात आहे.