परभणी शहरातील नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल!
परभणी (Animals Transport) : बोलेरो वाहनातून पशुंना दाटीवाटीने बसवून त्यांची क्रुरपणे वाहतूक केल्या प्रकरणी शहरातील येलदरकर कॉलनी वसमत रोड येथे वाहन पकडण्यात आले. ही कारवाई 27 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली. सदर कारवाईत पशुसह एकूण 3 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त (Confiscation of Goods) करण्यात आला आहे.
3 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त!
पोलीस अंमलदार (Police Officer) रामराव खुपसे यांच्या फिर्यादीवरुन चंदू शेख याच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. संबंधित इसम त्याच्या ताब्यातील एम. एच. 26 बी. ई. 4134 या क्रमांकाच्या वाहनामधून पशुंची निर्दयी वाहतूक करत असताना मिळून आला. सदर वाहनातून 5 बैल (Bull) जप्त करण्यात आले. नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून तपास पोह. धोंडगे करत आहेत.
