हिंगोली (Annasaheb Patil) : अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) आर्थिक मागास विकास महामंडळाच्या (Economic Backward Development Corporation) योजनांच्या माध्यमातून आज एक लाख मराठा उद्योजकांची संख्या पूर्ण झाली व महामंडळाचे एक लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती झाली. त्याबद्दल (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा सह्याद्री अतिथी गृह येथे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (मंत्री दर्जा) यांनी सत्कार केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यंत 10 हजार 14 लामार्थी झाले असून, बँकांनी 8 हजार 320 कोटी रुपये व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे व त्यापैकी महामंडळाने 832 कोटी रुपयाचा व्याज परतावा केला आहे.
मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले व या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजना बंद करुन नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले व या महामंडळाच्या अध्यक्ष पदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली.
https://twitter.com/Devendra_Office/status/1818499123038880235
महामंडळाचे अध्यक्ष पाटील (Annasaheb Patil) यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा करुन (Economic Backward Development Corporation) महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवकांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करुन (Maratha society) मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योजकांच्या प्रवाहात सामील केले. तसेच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकामार्फत कर्जपुरवठा मिळण्यासाठी सर्व संबंधितांच्या सातत्याने बैठका घेतल्या आणि राज्य सरकारच्या अर्थ विभागाने व्याज परतावा केला. महामंडळाचे अध्यक्ष पाटील (Annasaheb Patil) यांनी शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.