पूर्णतील झिरो टी पॉईंट येथे घडला अपघात रस्त्याच्या बाजुला असलेले हातगाडे उडवीले!
परभणी (Parbhani Theft) : परभणीतील पुर्णा शहरातील नांदेड मार्गावरील नवीन उड्डाणपुलाच्या जवळील बाबा पेट्रोल पंपाच्या गेटसमोर अज्ञात चोरटे गाडीतून वराह चोरून नेताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही घटना शनिवार १८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर घडली. चोरट्यांनी कार देखील चोरीचीच वापरली अशी माहिती पोलिसांनी दिली.
मालकीची गाडी अज्ञात चोरटे चोरून नेली, अशी नोंद!
पुर्णा शहरातील झिरो टी पॉईंटच्या समोर झालेल्या अपघातात रस्त्याच्या बाजूला असलेल्या हातगाडे, पावभाजीची दुकाने, पाणीपुरीचे गाडे अशा तीन ते चार गाड्यांना वाहनाने उडवले. त्यानंतर गाडी रोडच्या बाजूला असणार्या फूटपाथवर धडकून गाडीचे मोठे नुकसान झाले. चोरट्याने गाडी तिथेच सोडून दिली. सदरची एम.एच.०२ एफ.एन. ०१०३ ही गाडी पूर्णा येथुनच चोरलेली होती. पुर्णा पोलिसात याविषयी वराह पालक मनोज अनंतसिंह सौदा वय ५० वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीची गाडी अज्ञात चोरटे चोरून नेली, अशी नोंद केली. कार मालक यांना ही घटना सकाळी ६ वाजता समजली. तात्काळ त्यांनी बाबा पंपाजवळ जाऊन गाडीची पाहणी केली असता आत मध्ये डुक्कर बांधलेले आढळले. चोरीच्या गाडीतूनच वराहाची चोरी करण्याचा प्रयत्न काही अज्ञात चोरट्यांनी केला असा प्रकार समोर आला. त्यानंतर बांधलेल्या वराहांना सोडून देण्यात आले. सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्णा पोलिस (Purna Police) पुढील तपास करीत आहे.