पालक वर्ग आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित!
रिसोड (Annual Sports Day) : दी.आर्य शिक्षण संस्था, रिसोड द्वारा संचालित सनराईज इंग्लिश स्कूल, रिसोड येथे वार्षिक क्रीडा दिन २०२५-२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सनराइज् इंग्लिश स्कूलच्या (Sunrise English School) अध्यक्षा सौ. जयश्रीताई अनंतराव देशमुख यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून भा. मा. उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य श्री. संजय भांडेकर, भा. मा. व उच्च माध्यमिक कन्या शाळेच्या प्राचार्या सौ. मंजुषाताई देशमुख, भारत प्राथमिक शाळेच्या प्राचार्या सौ. किरणताई दुबे, सनराईज इंग्लिश स्कूल, मालेगावचे प्राचार्य श्री. सोजी सेबेस्टियन, सनराईज इंग्लिश स्कूल, रिसोडच्या प्राचार्या सौ. रोजमेरी जोस तसेच सीबीएसई को-ऑर्डिनेटर श्री. उमेश उंबरकर तसेच पालक वर्ग आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलींनी पिरॅमिड फॉर्मेशन सादर करून सर्वांचे लक्ष वेधले!
सौ. जयश्रीताई देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक व कार्यक्रमाची रूपरेषा सौ. मयुरी नकवाल मॅडम यांनी सादर केली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. के.जी. विभागाने झुंबा नृत्य, पाचवी-सहावीने “चले चलो” लगान नृत्य, पहिली ते चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी म्युझिकल पी.टी., इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रिबन डान्स, आठवी व नववीतील मुलांनी कलारीपयट्टू नृत्य, तर आठवी व नववीच्या मुलींनी पिरॅमिड फॉर्मेशन सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.
क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन!
यानंतर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सौ. जयश्रीताई देशमुख यांच्या हस्ते ऑलिम्पिक मशाल प्रज्वलनाने करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये इयत्ता दहावी मुलांची रिले रेस, दहावी मुलींची रिले रेस, सहावी मुलांची स्लो सायकल रेस, पाचवी मुलींची सायकल रेस, चौथी मुलांची सॅक रेस, केजी सेक्शनची बटाटा रेस आणि नर्सरी सेक्शन मुलींची म्युझिकल चेअर यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. तसेच नवीन पालकांसाठी “Get Ready To School” या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पालकांनी मनमुराद आनंद घेतला.
🏆 प्रथम पारितोषिक: सौ. वैशाली महेश छत्रे व शांभवी महेश छत्रे
🥈 द्वितीय पारितोषिक: सौ. जमुना आत्माराम रणबावळे व उन्नती आत्माराम रणबावळे
🥉 तृतीय पारितोषिक: सौ. सोनाली गजानन लांडे व सोहम गजानन लांडे यांचे
मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सौ. जयश्रीताई देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “अभ्यासासोबत खेळ सुद्धा विद्यार्थी जीवनात तितकाच आवश्यक आहे. क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास होतो आणि आत्मविश्वास वाढतो.” त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, थिमेटिक डान्स परफॉर्मन्सेस सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण!
दि आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतरावजी देशमुख आणि दि आर्य शिक्षण संस्थेचे सचिव ॲड .नकुल दादा देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी (Students) सादर केलेल्या विविध कार्यक्रमाचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, थिमेटिक डान्स परफॉर्मन्सेस यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व उपस्थित सर्व मान्यवर पालक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शुभांगी मानमोठे मॅडम व राजाभाऊ पुरी सर यांनी केले.