जिंतूर पोलिसात गुन्हा!
परभणी (Woman Molestation) : परभणीतील जिंतूर तालुक्यातील भोगावदेवी संस्थान इटोली शिवारात एका १८ वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी केलेला आणखी एक गुन्हा पुढे आला आहे. पिडीत ३१ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन आरोपींवर विनयभंग व इतर कलमाखाली जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
३१ वर्षीय महिलेचा केला विनयभंग!
पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत नमुद केल्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ च्या सुमारास कामळजा देवी मंदिराच्या वरच्या बाजुला असलेल्या टेकडीवर एका झाडाखाली सदर घटना घडली. फिर्यादी व साक्षीदार टेकडीवर फोटो काढत असताना त्या ठिकाणी आलेल्या पाच जणांनी साक्षीदाराचा गळा दाबला. झटापट करत तुम्ही कोण आहात, येथे कशाला आलात असे म्हणत मोबाईल काढून घेतला. पिडीतेने आम्हाला जाऊ द्या, तुम्हाला पैसे देतो असे म्हणत विनवनी केली. मात्र आरोपींनी फिर्यादी पिडीता व साक्षीदार यांचे व्हिडीओ करुन ती व्हायरल करण्याची धमकी दिली. पिडीतेसोबत अश्लिल वर्तन करत तिचा विनयभंग केला. पर्स हिसकावुन घेत त्यातील रक्कम काढून घेतली. या प्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरुन शेषेराव, अर्जुन, साबेर, राजा, करण यांच्यावर जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पो.नि. गजेंद्र सरोदे करत आहेत.
पिडीतांनी पुढे यावे!
सामुहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींनी या सारखे आणखी गुन्हे केल्याची शक्यता आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास देखील करत आहेत. पिडीतांनी देखील समोर येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पो.नि. गजेंद्र सरोदे यांनी केले आह




