चिमुकलीचा मृत्यू

खेळत असताना दोरीचा गळफास लागून चिमुकली मृत्यू

Little Girl Death: महाराष्ट्रातील रिसोडमध्ये 10 वर्षीय अश्विनी चौधरी खेळताना झोक्याला लागलेल्या गळफासामुळे मृत्यू झाला.

खेळत असताना दोरीचा गळफास लागून चिमुकली मृत्यू

Little Girl Death

रिसोड (Little Girl Death) : झोका खेळत असताना दोरीचा गळफास लागून एका दहा वर्षीय चिमुकलीचा जीव गेल्याची घटना दिनांक 23 मार्च रोजी दुपारी 1 वाजता महात्मा फुले नगर विश्वा लॉन च्या मागे घडली. अश्विनी राजू चौधरी वय 10 वर्ष असे मृतक चिमुकलीचे नाव असून या घटनेनंतर चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला व या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, अश्विनी ही घराच्या पाठीमागे लाकडाला बांधलेल्या झोक्याला एकटीच खेळत होती. दुपारची वेळ असल्याने या परिसरात अक्षरशा सन्नाटा होता. पुरुष हे आपल्या कामानिमित्ताने बाहेर गेले होते तर काही महिला व मुले हे घरातच होती.

अश्विनी ही (Little Girl Death) झोका खेळत असताना तिला दोरीचा गळफास बसला ही बाब शेजारच्या एका महिलेला समजली. सदर महिलेने ताबडतोब धावत येत अश्विनी ची आई व अन्य नागरिकांना याबाबत माहिती दिली. तिला लगेच आजूबाजूच्या नागरिकांनी धावत येत दोरी चा गळफास काढून ताबडतोब रिसोड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या ठिकाणी  डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.अश्विनी महात्मा फुले नगर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेतील चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी होती. अतिशय हुशार बोलकी असल्याने ती शाळेत सगळ्याच्या परिचयाची होती. अश्विनीला एक भाऊ व एक बहीण आहे. तिच्या जाण्याने चौधरी परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असून शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह परिवाराच्या स्वाधीन करण्यात आला संध्याकाळी तिचा अंतिम संस्कार करण्यात आला. वृत्तलिहेपर्यंत सदर प्रकरणी तक्रार दाखल झाली नाही.


उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारच्या वेळी नागरिक आपल्या घरातच राहणे पसंत करत असतात.अशातच लहान मुले बाहेर खेळत असल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे हे या (Little Girl Death) घटनेतून समजते. लहान मुले खेळत असताना ऊन, वारा, पाऊस, थंडी याकडे गांभीर्याने बघत नाहीत. यामुळे नागरिकांनी लहान मुलावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026