हानवतखेडा व्यक्ती मृत्यू

लोखंडी खुट्यावर पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hanvatkheda Person Death: हानवतखेडा, हिंगोळी: एक ७५ वर्षीय वृद्ध रामा कचरू जाधव बकरीचे बंधन करत असलेल्या वेळी अचानक लोहखंडी खुंट्यावर पडला. त्याला गंभीर दुखापती झाली

लोखंडी खुट्यावर पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hanvatkheda Person Death

 

हिंगोली तालुक्यातील हानवतखेडा येथील घटना

हिंगोली (Hanvatkheda Person Death) : तालुक्यातील ७५ वर्षीय वयोवृध्द व्यक्ती बकरी बांधण्याच्या लोखंडी खुंट्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्रावामुळे रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हनवतखेडा येथील रामा कचरु जाधव (७५) हे राहत्या घरी जनावरांच्या गोठ्यामध्ये बकरी बांधत असताना अचानक चक्कर आल्याने लोखंडी खुंट्यावर कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तात्काळ हिंगोलीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान १६ ऑगस्टला रात्री ८.४० च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

या (Hanvatkheda Person Death) प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात १७ ऑगस्टला विनोद रामा जाधव यांनी दिलेल्या माहिती वरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घारगे  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डि. के. दिघाडे हे करीत आहेत.  दरम्यान रामा कचरू जाधव यांच्यावर हनवतखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.

संबंधित सामग्री

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू

Sep 27, 2026
जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

Hingoli District Drought: एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर

Sep 24, 2026