आडगाव ग्रामपंचायत

आडगावात 20 वर्षांचा प्रश्न मार्गी: सरपंचांच्या पुढाकाराने 25 कुटुंबांना मिळाला नमुना नंबर 8

Adgaon Gram Panchayat: आडगावात 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नमुना नंबर 8 च्या प्रश्नाचे समाधान घडले. सरपंचांच्या प्रयत्नांमुळे गरीब कुटुंबांना योजनांचा लाभ मिळाला.

आडगावात 20 वर्षांचा प्रश्न मार्गी: सरपंचांच्या पुढाकाराने 25 कुटुंबांना मिळाला नमुना नंबर 8

Adgaon Gram Panchayat

हिंगोली (Adgaon Gram Panchayat) : मौजे आडगाव येथे गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेला गोरगरिबांचा नमुना नंबर 8 चा प्रश्न आज मार्गी लागला. सरपंच ज्ञानबा मुटकुळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे 27 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात 20 ते 25 लाभार्थी कुटुंबांना नमुना 8 चे वाटप करण्यात आले. 

गावातील अनेक भूमिहीन व गरीब कुटुंबे गेल्या 20 वर्षांपासून घरकुल व इतर शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित होती. नमुना 8 नसल्याने बँक कर्ज, घरकुल योजना, वीज कनेक्शन अशा अनेक सुविधांपासून ही कुटुंबे दूर होती. सरपंच ज्ञानबा मुटकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रश्न हाती घेतला. महसूल विभाग, तहसील कार्यालय व जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून कागदपत्रांची पूर्तता केली. त्यांच्या मेहनतीला आज यश आले.

नमुना 8 मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. या कार्याबद्दल सर्व लाभार्थ्यांच्या वतीने सरपंच ज्ञानबा मुटकुळे, ग्रामविकास अधिकारी व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच रमेश जाधव यांनी केले. यावेळी बोलताना सरपंच मुटकुळे म्हणाले, "गोरगरिबांना त्यांचा हक्क मिळवून देणे हीच खरी ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. पुढील काळातही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध राहू."

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 20 वर्षांनंतर न्याय मिळाल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नमुना 8 म्हणजे काय?
नमुना नंबर 8 हा ग्रामपंचायतीचा मालमत्ता नोंदणीचा उतारा आहे. घराची मालकी सिद्ध करण्यासाठी, घरकुल योजना, बँक कर्ज व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हा दाखला अत्यावश्यक असतो.

संबंधित सामग्री

जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा! इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, पेण स्थानकात तीन तासांपासून गाडी उभी

जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा! इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, पेण स्थानकात तीन तासांपासून गाडी उभी

पेण स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेस तीन तासांपासून थांबली आहे. इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Sep 29, 2026
बोरी शिकारी उपसरपंचाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

बोरी शिकारी उपसरपंचाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

Bori Shikari Deputy Sarpanch Death: हिंगोली तालुक्यातील बोरी शिकारी येथील रहिवासी तथा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबासाहेब भिवाजी पाईकराव  यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

Sep 24, 2026
जळगावच्या भडगावमध्ये रुद्राक्ष विक्रीच्या पैशांवरून वाद विकोपाला; बॅगेत मृताचे दात आणि दोन जिवंत कबुतरे आढळली

जळगावच्या भडगावमध्ये रुद्राक्ष विक्रीच्या पैशांवरून वाद विकोपाला; बॅगेत मृताचे दात आणि दोन जिवंत कबुतरे आढळली

भडगावमध्ये 800 रुपयांच्या वादातून तरुणाचा मृत्यू झाला. संशयित आरोपीला पोलिसांनी शेतातून ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Sep 22, 2026
मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Transgender Education Scholarship: तृतीयपंथीयांना शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृ‍तिक ‍विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार

Sep 10, 2026
पातुर तालुक्यात सन २०२५ ते २०३० कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

पातुर तालुक्यात सन २०२५ ते २०३० कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

Sarpanch post reservation: पातुर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) व सर्वसाधारण सरपंच पदाची आरक्षण सोडत (महिला आरक्षणासह)

Sep 10, 2026