कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शनिवारी पीक परिस्थितीची पाहणी करणार; पोलिसांच्या बंदोबस्ताचा ताण वाढणार 

Minister Dattatray Bharne: दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी, अशा परिस्थितीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात पीक परिस्थितीची पाहणी

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शनिवारी पीक परिस्थितीची पाहणी करणार; पोलिसांच्या बंदोबस्ताचा ताण वाढणार 

Minister Dattatray Bharne

हिंगोली (Minister Dattatray Bharne) : दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात १९ सप्टेंबरला पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यांच्या या दौर्‍यामुळे पोलिसांच्या बंदोबस्ताचा तान ऐन गणेश उत्सव कालावधीत वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे १९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक परिस्थितीची पाहणी करण्याकरीता येणार आहेत.

दुपारी वसमत तालुक्यातील बोराळा तर दुपारी १ वाजता औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा येथे पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ना. दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्ह्यामध्ये रवाना होणार आहेत. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी व विविध पक्षाकडून केली जात आहे. त्यातच आता ना. भरणे यांचा दौरा आल्याने पोलिसांचा तान वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.