अकोल्यात दोन दिवसांत दोन हत्या

अकोला शहराजवळ यावलखेडमध्ये धारदार शस्त्राने पत्नीची हत्या

अकोला जवळील यावलखेडमध्ये पतीने धारदार शस्त्र चाकूने पत्नीची हत्या केली. पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेमुळे समाजमध्ये हळहळ व्यक्त.

अकोला शहराजवळ यावलखेडमध्ये धारदार शस्त्राने पत्नीची हत्या

- सलग दोन दिवसांत दोन हत्या, जिल्हा हादरला

- अकोला शहराजवळील यावलखेड येथील घटना

- आरोपी पतीस अवघ्या एका तासात अटक

अकोला : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच अकोला शहराजवळ असलेल्या यावलखेड येथे घरगुती वादातून पतीने धारदार शस्त्र चाकूने वार करून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, ९ एप्रिल राेजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस अवघ्या एका तासात अटक करून बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल ओंकार निंभोकार (४२) रा. यावलखेड याने कौटुंबिक वादाच्या रागातून पत्नी वृषाली अनिल निंभोकार (३२) हिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वृषाली निंभोकार हिचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, विष्णू बोडखे, अंमलदार सुलतान पठाण, गोकूळ चव्हाण, मोहम्मद आमीर, अशोक सोनवणे यांनी केली आहे. ------------- आरोपी फरार होण्याच्या बेतात घटनेनंतर आरोपी अनिल निंभोकार हा अकोल्यातून फरार होण्याच्या बेतात असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तत्काळ माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पथक रवाना करण्यात आले.

 ग्रामस्थांनी केले महिलेला उपचारार्थ दाखल

आरोपी पतीने पत्नीची धारदार शस्त्र चाकूने वार करून हत्या केल्यानंतर यावलखेड गावातील ग्रामस्थांनी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात तिला उपचारार्थ दाखल केले. परंतु, त्यापूर्वीच सदर महिलेचा मृत्यू झाला होता.

- आरोपीला सर्वोपचार रुग्णालयातून केली अटक

सदर पथकाने आरोपीस अकोला शहरातील सर्वोपचार रुग्णालय येथून ताब्यात घेत पोलीस स्टेशन बोरगाव मंजू यांच्या स्वाधीन केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन बोरगाव मंजू करीत आहे.

दोन्ही चिमुकले झाले पोरके

आरोपी पती अनिल निंभोकार याने पत्नी वृषाली अनिल निंभोकार हिची संतापाच्या भरात धारदार शस्त्र चाकूने वार करून हत्या केली. त्यांना दोन मुले असून, एक 11 तर दुसरा 8 वर्षाचा आहे. या हत्येमुळे दोन्ही चिमुकले आता पोरके झाल्याने यावलखेड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, समाजमन सुन्न झाले आहे.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026