दारूबंदी महिला मारहाण

दारूबंदीच्या बैठकीत भाग का घेतला?, म्हणत शिराळ्यात महिलेला मारहाण

Alcohol Ban Women Assault: 'दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत तू भाग का घेतला?' असे म्हणत लातूर तालुक्यातील शिराळा येथे सुलाबाई सातपुते या महिलेला दारू विक्रेत्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण

दारूबंदीच्या बैठकीत भाग का घेतला?, म्हणत शिराळ्यात महिलेला मारहाण

Alcohol Ban Women Assault

 

दारू विक्रेत्याचा प्रताप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

लातूर (Alcohol Ban Women Assault) : 'दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत तू भाग का घेतला?' असे म्हणत लातूर तालुक्यातील शिराळा येथे सुलाबाई सातपुते या महिलेला दारू विक्रेत्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत डोक्यात पत्रा मारून जखमी केले. गुरुवारी ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणी दारूबंदीसाठी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी मुरुडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाची भेट घेऊन या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच शिराळा येथील दारूबंदीसाठी मंगळवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी शिराळा ते मुरुड पायी मोर्चा काढण्याचा पुन्हा एकदा इशारा दिला. 

गुरुवारी शिराळा येथे एका दारू विक्रेत्यांनी (Alcohol Ban Women Assault) सुलाबाई सातपुते या महिलेला तू दारूबंदीच्या बैठकीत भाग का घेतला? असा सवाल करीत घाण घाण शिवीगाळ केली. तिच्या डोक्यात पत्रा मारला व जखमी केले. तसेच लाता बुक्क्यांनी मारहाण केली. दारू विक्रेत्याकडून झालेल्या या मारहाणी नंतर गावामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. दारू विक्रेत्यांना पोलिसांचे पाठबळ असल्याने दारू विक्रेत्यांचा उच्छाद वाढल्याचा आरोप प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केला. मारहाणी नंतर खंडापूरकर यांनी मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अंधारे यांची भेट घेऊन, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

मंगळवारी निघणाऱ्या शिराळा ते मुरुड पोलीस ठाणे पायी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्यासह, वैभव घोबाळे, नेताजी जाधव जिल्हाध्यक्ष, नागेश जाधव जिल्हाध्यक्ष, रामेश्वर डोणे, आकाश मुळे जिल्हाध्यक्ष, अरविंद पारवे, जिल्हाध्यक्ष दिव्यांग, रामप्रसाद बोराडे लातूर तालुका अध्यक्ष, शिवराज देशमुख लातुर तालुका अध्यक्ष कृषी, भिभराव वराडे जिल्हाध्यक्ष युवक लातुर, युवराज सुरवसे लातूर तालुका अध्यक्ष, धनाजी जाधव जिल्हा उपाध्यक्ष, राहुल झुंजे लातूर तालुका अध्यक्ष युवक यांनी केले आहे.

25 माणसे दोन वर्षात दगावली! 
लातूर तालुक्यातील शिराळा येथे अवैध दारुने धुमाकूळ घातला आहे. एकीकडे लातूरचे जिल्हा पोलीस प्रशासन 'हेल्मेट घाला, जीव वाचवा', अशी महत्वपूर्ण मोहीम राबवत असताना दुसरीकडे शिराळ्यासारख्या एका गावात अवघ्या दोन वर्षात 25 माणसे दारूमुळे दगावली, असा आरोप करून पोलीस वाले अवैध दारू विक्रेत्या विरुद्ध कडक कारवाई करीत नाहीत, असा आरोप प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केला. त्यामुळेच या दारूबंदीच्या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी (दि. 8 सप्टेंबर) शिराळा येथून मुरुड पोलीस ठाण्यावर पायी मोर्चाचा इशारा त्यांनी दिला.