धनगर समाज मोर्चा

त्या महेश बिडगर मारहाण प्रकरणी सकल धनगर समाजाचा मोर्चा...!

Dhangar Samaj Morcha: गंगाखेड येथे धनगर समाजातील युवक महेश बिडगर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवार ११ जुलै रोजी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने गंगाखेड येथे काढण्यात आलेल्या मोर्चा

त्या महेश बिडगर मारहाण प्रकरणी सकल धनगर समाजाचा मोर्चा...!

Dhangar Samaj Morcha

 

पोलीस प्रशासन व स्थानिक आमदार यांच्याविरुद्ध व्यक्त केला रोष  पोलिस अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

परभणी (Dhangar Samaj Morcha) : गंगाखेड येथे धनगर समाजातील युवक महेश बिडगर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवार ११ जुलै रोजी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने गंगाखेड येथे काढण्यात आलेल्या मोर्चात मारहाणीच्या या घटनेच्या मागील सूत्रधारांचा शोध घ्यावा तसेच पोलीस प्रशासनातील अधिकार्‍यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी करत स्थानिक आमदारांविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला आहे.

काही समाज कंटकांनी मंगळवार ७ जुलै रोजी धनगर समाजातील युवक महेश बिडगर यास पोलीस ठाण्यातून बाहेर आणत  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर महेश बिडगर याच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा ही दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवार ११ जुलै रोजी सकल धनगर समाज बांधवांसह विविध पक्षातील राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांत्यांच्या उपस्थित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला.

बिडगर याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा, घटने दरम्यान कर्तव्यत कसूर करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांर्‍या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, घटनेच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडीओ तसेच प्रत्यक्षदर्शिचे जबाब नोंदवून निष्पक्ष तपास करावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, अप्पर पोलीस अधिक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. हा मोर्चा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथून सुरु होऊन मोर्चाची सांगता दुपारी २ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आली.

यावेळी माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, दिपक बोराडे, गणेशराव हाके, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, विठ्ठलराव रबदडे, प्रणित खजे, शशिकांत वडकुते, पवन करवर, अ‍ॅड.मिथिलेश केंद्रे, श्रीकांत भोसले, शारदाताई पांढरे, मारोती बनसोडे, उद्धव शिंदे, धम्मानंद घोबाळे, क्षितिज चौधरी, बाबासाहेब टेकाळे, साधनाताई राठोड, जितेश गोरे, भाऊसाहेब कुकडे, भगवान सानप, रामप्रभू मुंडे, राम मदन, प्रशांत रोडगे आदी उपस्थित होते.

व्यापार्‍यांना मारहाण; सीसीटीव्हीत हल्लेखोर कैद
 या प्रकरणात काढण्यात आलेला निषेध मोर्चा सुरु असतांना काही समाज कंटकांनी मोंढा परिसरात कृषी व मशीनरी व्यापार्‍यांच्या दुकानावर दगडफेक करून दोघांवर जिवघेणा हल्ला करत लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. यातील हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असुन त्यांची ओळख पटवून तात्काळ अटक करण्याची मागणी जखमी झालेल्या व्यापार्‍यांनी केली आहे. याप्रसंगी असंख्य व्यापारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

पातुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीचे सत्र; राहेर येथील शेतकरी हवालदिल

पातुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीचे सत्र; राहेर येथील शेतकरी हवालदिल

पातुर तालुक्यातील राहेर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Apr 01, 2026