चिचोली निळोबा अवैध छापा

चिचोली निळोबा येथे छापा; अवैध सावकारीचे प्रकरण उघडकीस

Chicholi Niloba Illegal Raid: ऑंधा तालुक्यातील चिचोली निळोबा येथील शेतकरी सुंदरराव मोरे यांच्यावर अवैध करार मिळवून घेण्याच्या धमकीने शेतातील जमीनच्याही खरेदी होण्याचा प्रयत्न

चिचोली निळोबा येथे छापा; अवैध सावकारीचे प्रकरण उघडकीस

Chicholi Niloba Illegal Raid

हिंगोली (Chicholi Niloba Illegal Raid) : अवैध सावकारीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिचोली निळोबा येथे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या पथकाने गुरुवारी 9 जुलै रोजी सकाळी 7 वाजता एका घरावर धाड टाकून अवैध सावकारीचे प्रकरण उघडकीस आणले.

औंढा नागनाथ तालुक्यातील चिचोली निळोबा (Chicholi Niloba Illegal Raid) येथील सुंदरराव मोरे यांच्याविरुद्ध एका शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने सांगितले की काही रक्कम घेऊन त्यांनी आपली शेती मोरे यांच्या नावावर करून दिली होती. मात्र रक्कम परत करूनही जमीन परत मिळत नसल्याने त्यांनी प्रशासनाकडे मदत मागितली. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.

सहकार अधिकारी बी. डी. पठाडे, ए. ए. वानखेडे, एस. जी. आंधळे, के. जी. घालेवाड, जमादार रोहिदास राठोड आणि महिला पोलीस कर्मचारी साधना शेळके यांचा समावेश असलेल्या पथकाने चिचोली निळोबा येथे सुंदरराव मोरे यांच्या घराची झडती घेतली. घरातील पेटी आणि इतर साहित्याची तपासणी केली असता तेथे शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भातील 11 खरेदीखत आढळून आली. याशिवाय तीन बॉण्डवर जागेची खरेदीखत करण्यात आल्याचे दिसून आले. पथकाला 9 कोरे बॉण्ड, पैशाच्या व्यवहाराच्या पाच चिट्ठ्या आणि सन 2017 पासूनच्या सात दिनदर्शिका देखील सापडल्या. या दिनदर्शिकांमध्ये पैशाच्या व्यवहारांच्या तारखा नमूद करण्यात आल्या होत्या.

पथकाने पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले असून ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आणण्यात आले आहे. या (Chicholi Niloba Illegal Raid) कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी माहिती दिली की जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी मंगळवारी 14 जुलै रोजी केली जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र सावकारी विरोधी कायद्याच्या कलम 15 नुसार सुनावणी घेण्यात येईल. सुनावणी दरम्यान खरेदीखत नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

संबंधित सामग्री

कोटगुलमध्ये नवी पिढी बरबाद करण्याचे षडयंत्र?

कोटगुलमध्ये नवी पिढी बरबाद करण्याचे षडयंत्र?

Kotgul illegal business: एका बाजूने कोटगुल परिसरातील युवक आदिवासी विभागात उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून लागत आहेत, तर दुसऱ्या बाजूने याच परिसरातील युवकांना अवैध धंद्यात

Aug 30, 2026
पूल खचला प्रकरणी ना. नितीन गडकरींकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

पूल खचला प्रकरणी ना. नितीन गडकरींकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Asoda Flyover Damage Case: राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Aug 06, 2026
बियाणे तक्रारींचे तातडीने निवारण करुन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा

बियाणे तक्रारींचे तातडीने निवारण करुन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा

Collector Rahul Gupta: बियाणे जिल्ह्यातील बियाणे कंपन्यांना बोगस बियाणे विक्रित करण्यासाठी कठोर काळ्याशी युक्त करून, शेतकऱ्यांच्या तक्रारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

Jul 27, 2026
परभणीत १७ महसूल मंडळांवरील विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले..

परभणीत १७ महसूल मंडळांवरील विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले..

Parbhani Pik Vima: पीक विमा कंपनीने १७ महसूल मंडळांबाबत दाखल केलेले आक्षेप विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावत जिल्हाधिकारी परभणी यांनी सादर केलेला अहवाल मान्य केला आहे.

Jul 23, 2026
गव्हा येथील अघोषित भारनियमन बंद करावे; मुख्यमंत्री यांना निवेदन 

गव्हा येथील अघोषित भारनियमन बंद करावे; मुख्यमंत्री यांना निवेदन 

Gavha Load Shedding: गव्हा येथे रात्रीच्या ७ ते १० वाजून होणारे अघोषित भारण नियम थांबवावे, असे मुख्यमंत्री तेव्हा ऊरज मंत्रीच्या नावाने संस्थानिक अधिकाऱ्यावर निवेदन.

Jul 20, 2026