अरुणावती पेट्रोल पंप मारहाण प्रकरण

अरुणावती पेट्रोल पंपावरील मारहाण प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Arunavati Petrol Pump Assault Case: मानोरा - मंगरूळपीर राष्ट्रीय महामार्गावरील आमगव्हाण फाट्यावरील अरुणावती पेट्रोल पंपावर दि. १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉड

अरुणावती पेट्रोल पंपावरील मारहाण प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Arunavati Petrol Pump Assault Case

 

२ पुरुषासह ४ महीला आरोपी आरोपी अटकेत
'लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला, पोलिसांची तात्काळ कारवाई
मानोरा पोलिसांची कामगिरी

मानोरा (Arunavati Petrol Pump Assault Case) : मानोरा - मंगरूळपीर राष्ट्रीय महामार्गावरील आमगव्हाण फाट्यावरील अरुणावती पेट्रोल पंपावर दि. १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मानोरा पोलीस स्टेशनने तात्काळ कारवाई करत २ पुरुष व ४ महिलांसह एकूण ६ आरोपींना अटक केली आहे.
 
पोलीस स्टेशन मानोरा यांच्या प्रेस नोटनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास मानोरा कडून येणारी एक डिझायर गाडी मधून एक अनोळखी इसम उतरून पंपावरील बाथरूमला गेला होता. परंतु पंपावरील बाथरूम मध्ये जखमी फिर्यादी  हा अगोदरच होता. बाथरूम उघडण्याच्या कारणावरून सदर इसमाने फिर्यादीस अश्लील भाषेत शिवीगाळ केली. भांडणाच्या आवाजामुळे स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये बसलेला आरोपी क्रमांक दिशा नाशिक फकीरावाले  हा हातामध्ये लोखंडी रॉड घेऊन धावत आला, तसेच महिला सुद्धा धावत आल्या.

आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी व जखमी यास जिवाने मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून दोघांनाही गंभीर जखमी केले. तसेच इतर चार महिलांनी थापडा बुक्क्याने मारहाण करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व तेथून निघून गेले. या प्रकरणी फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट व जखमी मेडिकल सर्टिफिकेट वरून पोलीस स्टेशन मानोरा येथे अपराध क्रमांक ५००/२०२६, कलम १०९(१), २९६, ११५(२), ३५१(२)(३), ३५२, १८९(२), १९०, १९१(२)(३) भा.न्या.सं. प्रमाणे आरोपी नामे  जिशान अशफाक फकिरवाले, वय २३ वर्ष,  मुबारक रमजान परसवाले, वय ४५ वर्षे  सर्व राहणार गवळीपुरा दिग्रस, जि. यवतमाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस स्टेशन मंगरूळपीर हद्दीत पोलीस स्टाफने सापळा रचून शोध घेऊन आरोपींना दि. २० सप्टेंबर रोजी अटक  करण्यात आली. आरोपी क्रमांक जीशान अश्फाक फकीरवाले याने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड घटनास्थळावरून जप्त करण्यात आला, तसेच आरोपींचे वाहन सुद्धा जप्त करण्यात आले आहे. आरोपींना अटक करून विद्यमान न्यायालयात हजर केले असता दोन पुरुष आरोपींना न्यायालयाने पोलीस कस्टडी (पीसीआर) दिला असून ४ महिलांना एमसीआर वर दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई  पोलीस अधीक्षक  निकेश खाटमोडे-पाटील, सहाय्यक अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक नयना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मानोरा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामबाबू सरोदे, पोलीस अंमलदार गोकुळ पांडुळे करीत आहेत. या प्रकरणातील पुरुष आरोपींतावर यवतमाळ जिल्हयात पूर्वीचे ३०७ व राईटचे गुन्हे दाखल असुन महिला आरोपींची वाशिम सेंट्रल कारागृहात रवानगी झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे. 

संबंधित सामग्री

अरुणावती पेट्रोल पंपावर कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण

अरुणावती पेट्रोल पंपावर कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण

Arunavati Petrol Pump Assault Case: आमगव्हाण गावाजवळ असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव अमोल पाटणकर यांच्या अरुणावती पेट्रोल पंपावर कामगाराला लोखंडी रॉडने  मारहाण

Sep 20, 2026