रिसोड (Ashadhi Ekadashi Celebration) : विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार व भारतीय सांस्कृतिक परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने पी. एम. पब्लिक स्कूल, रिसोड तालुक्यातील आगरवाडी येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या (Ashadhi Ekadashi Celebration) कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम" व "पांडुरंग हरी"च्या जयघोषात पालखीची दिंडी मिरवणूक काढली. वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी अभंग, भजन व हरिनाम संकीर्तन सादर करून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय, एकात्मता, शिस्त आणि संस्कार यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपस्थीत पालक व नागरिकांनी या नयनरम्य सोहळ्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले. शाळेचे संचालक हरिदास काकडे, मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्तम नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
पी. एम. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य पालखी सोहळा उत्साहात
Ashadhi Ekadashi Celebration: द्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार व भारतीय सांस्कृतिक परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने पी. एम. पब्लिक स्कूल, रिसोड तालुक्यातील आगरवाडी येथे आषाढी एकादशी
Ashadhi Ekadashi Celebration
संबंधित सामग्री
परभणीत शिवसेनेच्या वतीने ३१ ऑगस्टला परभणीत कावड यात्रा ...!
Parbhani Kavad Yatra: श्रावण महिण्या निमित्त शिवसेनेच्या वतीने ३१ ऑगस्ट रोजी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेसंदर्भात गुरुवार २० ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय
आषाढी एकादशीसाठी हिंगोली आगारातून पंढरपूरला धावल्या ५२ बसेस
Hingoli Ashadhi Ekadashi Bus: आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना पंढरपूरला सुखकर दर्शनासाठी पाठविण्यासाठी हिंगोली एसटी आगारातून विशेष नियोजन करण्यात आले होते.
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष
Risod Maharajswa Abhiyan: महाराष्ट्र शासन, तहसील कायम करत 'छत्रपती शिवाजीच्या महाराजस्व अभियान' योजनेसाठी रिसोड येथे आयोजित एक सांस्कृतिक कार्यक्रमात सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी
साडेतीनशे वर्षांची परंपरा जपणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचे चिखलीत भक्तिमय स्वागत
Saint Muktabai Palkhi: साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचे चिखलीत मोकळा भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक समारोहात नगराध्यक्ष, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग
शंकर नगर येथे एनसीसीच्या वार्षिक शिबीरासाठी १० विद्यार्थिंनी रवाना
NCC Annual Camp: नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे २५ मे ते ३ जूनपर्यंत एनसीसीचे वार्षिक शिबीर होणार आहे. सरजुदेवी भिकुलाल भारुका विद्यालयाच्या १० विद्यार्थी शिबीरासाठी रवाना