औंढा नागनाथ (Aundha Nagnath Bandh) : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाचा सातवा दिवस असून सुद्धा राज्य शासनाने उपोषणाची दखल घेतली नाही व मागण्या मान्य केल्या नाहीत. म्हणून उपोषणाच्या समर्थनात पाठिंबा म्हणून औंढा नागनाथ शहर ४ सप्टेंबर रोजी शुक्रवारी रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते.
हा (Aundha Nagnath Bandh) बंद शांततेत पार पडला व प्रतिसाद दिसून आला १०० टक्के बंद यशस्वी झाला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उप पोलीस निरीक्षक शेख खुदुस, अमोल इंगोले, श्रीधर वाघमारे, यशवंत गुरु पवार, जमादार बबन चव्हाण, जयदीप जाधव, अमोल चव्हाण, ज्ञानेश्वर सावळे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
औंढा नागनाथ बंद
औंढा ना. शहर बंदला शंभर टक्के प्रतिसाद
Aundha Nagnath Bandh: मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाचा सातवा दिवस असून सुद्धा राज्य शासन
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Aundha Nagnath Bandh
टैग्स:
Aundha Nagnath Bandh