Baliraja Pandan Road Scheme

शासकीय पांदण रस्ता जेसीबीने खोदून केला बंद; न्यायासाठी शेतकऱ्याचे 'प्राणत्याग' आंदोलन सुरू

न्याय न मिळाल्याने त्यांनी दि. १ जुलै रोजी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून प्राणत्याग आंदोलन सुरू केले आहे.

शासकीय पांदण रस्ता जेसीबीने खोदून केला बंद; न्यायासाठी शेतकऱ्याचे 'प्राणत्याग' आंदोलन सुरू

Baliraja Pandan Road Scheme

मानोरा तालुक्यातील गादेगाव येथील प्रकार; पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्याचे आंदोलन

मानोरा (Baliraja Pandan Road Scheme) : मानोरा तालुक्यातील गादेगाव येथील शासकीय पांदण रस्ता एका व्यक्तीकडून जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदून बंद केल्याचा आरोप करत प्रवीण भिमराव राठोड या शेतकऱ्याने न्यायासाठी "प्राणत्याग" आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना दिला होता. न्याय न मिळाल्याने त्यांनी दि. १ जुलै रोजी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून प्राणत्याग आंदोलन सुरू केले आहे.

तहसीलदार व ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी प्रवीण राठोड यांनी म्हटले आहे की, गादेगाव येथील सुदाम भीका जाधव यांनी शासकीय पांदण रस्ता जेसीबीने खोदून बंद केला. त्यामुळे या रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पेरणीची कामे ठप्प झाली आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असताना रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर शेतात जाणे आणि पेरणी करणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर रस्ता शासनाच्या 'बळीराजा पांदण रस्ता योजना' अंतर्गत सन २०११-१२ मध्ये म.ग्रा.रा.रो.ह. योजनेतून बांधण्यात आला होता. शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या रस्त्याची तोडफोड करून शासकीय निधीचे नुकसान करणाऱ्याविरुद्ध अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

जेसीबी जप्त न करणे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा पंचनामा अहवाल, ग्रामपंचायत सचिव गादेगाव यांनी मानोरा पोलीस ठाण्याला पाठवलेले कार्यवाहीचे पत्र, शेतकऱ्यांची तक्रार तसेच उपलब्ध साक्षी-पुरावे असूनही संबंधित यंत्रणा उदासीन असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासन यंत्रणेच्या उदासीनतेमुळे न्याय मिळत नसल्याने "प्राणत्याग" हाच न्याय मिळविण्याचा एकमेव पर्याय उरल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी कृषी दिनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून उडी घेण्यासाठी प्राणत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

Manora Drought declared: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने काढलेला दुष्काळी शासन निर्णय 'कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर' आहे. दुष्काळी उपाययोजना

Sep 28, 2026
तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

Manora Tehsil Office: मानोरा शहरातील गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा भटक्या श्वानांचा मुक्त वावर वाढला असून, कामकाजाच्या वेळेतच या कुत्र्यांनी सरकारी कार्यालयात..

Sep 27, 2026
कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026
बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

Sep 26, 2026