Baramati Visit

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

Baramati Visit

विद्या प्रतिष्ठानच्या ‘प्रेरणास्थळा’चे मोदींच्या हस्ते उद्घाटन; गौतम बुद्धांच्या पुतळ्याचेही होणार अनावरण

महाराष्ट्रातील कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पवार बारामतीत असून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. 

शेतकऱ्यांना कमी पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांनीही शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत.

३ नोव्हेंबरला मोदी बारामतीत

शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबर रोजी बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळ’ या मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे. 

मोदी यांना बारामतीतील या कार्यक्रमासाठी यापूर्वी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यामुळे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे, संबंधित मंत्री आणि विद्या प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून कार्यक्रमासाठी पाठपुरावा करण्यात आला. आता ३ नोव्हेंबर ही तारीख निश्चित झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

असा असेल पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम

शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता बारामती विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठानच्या कॅम्पसमधील कार्यक्रमस्थळी जातील. ‘प्रेरणास्थळा’ला भेट देऊन तेथील गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. उद्योग, शिक्षण आणि विविध संस्थांमधील प्रमुख व्यक्तींनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संबंधित मान्यवर तसेच मायक्रोसॉफ्टच्या नेतृत्वालाही निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

काय आहे ‘प्रेरणास्थळा’मागची संकल्पना?

विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मचिंतन आणि व्यक्तिमत्त्व विकासाची भावना रुजवणे हा आहे. या ठिकाणी विविध महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांमधून आणि कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, तसेच जीवनात मूल्यांची जोपासना व्हावी, या उद्देशाने ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. ThePrint

‘प्रेरणास्थळा’मध्ये गौतम बुद्धांच्या पुतळ्यासह विविध महापुरुषांच्या जीवनकार्याशी संबंधित चित्रे आणि माहितीचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी देशातील उद्योगजगत, शैक्षणिक संस्था आणि विविध फाउंडेशनच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026