'बर्ड फ्ल्यू'चा धोका प्रशासन निद्रावस्थेत

'बर्ड फ्ल्यू'चा धोका प्रशासन निद्रावस्थेत

Bird Flu Outbreak

मध्यवर्ती अंडी उबवणी केन्द्र परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित

नागपूर (Bird Flu Outbreak) : शहरातील सेमिनरी हिल्स परिसरातील शासकीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. संसर्गाची खात्री झाल्यानंतर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत केंद्रातील एक हजारांहून अधिक कोंबड्यांचा नाश करण्यात आला असून सुमारे १४ हजार अंडीही जमिनीत पुरून नष्ट करण्यात आली आहेत. मात्र याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे माहिती नसल्याचे आढळून आले. परिणामी प्रशासन निद्रावस्थेत असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


'बर्ड फ्ल्यु'चा धोका; प्रशासन निद्रावस्थेत

या केंद्रात अचानक कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. हे नमुने भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस (सीएसआयआर प्रयोगशाळा) येथे पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात बर्ड फ्लूचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली. मात्र जिल्हा परिषदेसह पशुसंवर्धन विभागात निरव शांतता आढळून आली. दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवत एक-दुसऱ्यांची नावे सांगताना आढळून आले. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या भागात व्यापक सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. अंडी उबवणी केंद्राच्या एक किलोमीटर परिसरातील घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पथके घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत. विशेषतः सर्दी, ताप यांसारखी लक्षणे असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच १० किलोमीटर परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या भागातील संभाव्य रुग्णांवर देखील सतत नजर ठेवली जात आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. एक किलोमीटर परिसरात कोणतेही पशुपक्षी संबंधित कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परिसरातील कुक्कुटपालन, कोंबड्यांची खरेदी-विक्री, चिकन विक्रीची दुकाने आणि पशुखाद्याची खरेदी-विक्री यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, या केंद्रातील कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे ३० कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दहा दिवसांची औषधे देण्यात आली आहेत. त्यांच्या आरोग्यावरही विशेष लक्ष ठेवले जात आहे.

परिस्थिती नियंत्रणात असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पक्ष्यांच्या स्त्रावाशी संपर्क टाळावा, कच्चे चिकन व अंडी हाताळताना दक्षता घ्यावी, मांस पूर्णपणे शिजवूनच खावे, तसेच आजारी किंवा मृत पक्ष्यांना उघड्या हाताने स्पर्श करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी

सेमीनरी हिल भागात 'शासकीय अंडी उबवणी केंद्र' आहे. केंद्राच्या एक किलोमीटर परिसरात कृषी प्रदर्शनासह पशु प्राण्यांसह कार्यक्रमावर निर्बंध लागू केले आहेत. या भागातील अन्य पक्षांना बर्ड-फफ्ल्यूचा प्रसार होऊ नये, यासाठी १० किलोमीटरचा परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. या भागातील अन्य पक्षांचे नमुनेही गोळा करून कुठे शंका आली तर पक्षाचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविले जाणार आहेत. याशिवाय या परिसरातील चिकन विक्रीची दुकाने बंद करण्यात आली आहे. तसेच कुक्कुटपालन खाद्याच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय परिसरात कुणीही कोंबडी पाळणार नाही, कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

फ्लाय-दुबई पायलट स्मित माछर यांनी PM मोदींशी संवादात विमानातील संकटाचा अनुभव सांगितला. हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Oct 02, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

Sep 29, 2026
LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric: ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले: पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालय

Sep 21, 2026
भारतावर 100 टक्के टॅरिफचा धोका; रशियन तेलावरून अमेरिका-भारत आमनेसामने

भारतावर 100 टक्के टॅरिफचा धोका; रशियन तेलावरून अमेरिका-भारत आमनेसामने

India 100 percent Tariff: रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देणारे ‘लिंडसी ओ. ग्रॅहम यांचा रशिया आणि इराण

Sep 17, 2026
गणेशमूर्ती कोसळली, मोठी दुर्घटना टळली!

गणेशमूर्ती कोसळली, मोठी दुर्घटना टळली!

Ganeshotsav: मिरवणुकीत नेली जात असलेल्या गणेशमूर्तीचा अचानक तोल जाऊन ती भाविकांच्या अंगावर कोसळली. या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Sep 13, 2026