बोरडा ई-लायब्ररी

बोरडा (गणेशी) येथे ई-लायब्ररीचे उद्घाटन उत्साहात

Borda E-Library: ग्रामपंचायत बोरडा (गणेशी) येथे विद्या र्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उभारण्यात आलेल्या ई - लायब्ररीचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमाचा गावातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आधुनिक

बोरडा (गणेशी) येथे ई-लायब्ररीचे उद्घाटन उत्साहात

Borda E-Library

कन्हान () : ग्रामपंचायत बोरडा (गणेशी) येथे विद्या र्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उभारण्यात आलेल्या ई - लायब्ररीचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमाचा गावातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातुन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन सरपंच रेखाताई डुडरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. रेखाताई बेनीरामजी डुडरे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करून विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापुन ई-लायब्ररीचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच नरेंद्र ठाकरे, सदस्य रामराव बंड, सदस्या संगीता टेकाम यांच्यासह ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. विद्या र्थ्यांनी ई - लायब्ररीचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञाना च्या सहाय्याने अभ्यास करावा व स्पर्धा परीक्षांसह विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असेही सरपंचांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

या (Borda E-Library) कार्यक्रमाला गावाती ल जेष्ट मंडळी, नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वि आयोजनासाठी ग्राम पंचायत सचिव मेहर व ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

‘आधुनिक शिक्षण पद्धतीत सनातन विचार असावा’: भाईश्री रमेशभाई ओझा

‘आधुनिक शिक्षण पद्धतीत सनातन विचार असावा’: भाईश्री रमेशभाई ओझा

Bhaishree Rameshbhai Ojha: सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सनातन विचार समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे. आपली ओळख आपल्या परंपरेतूनच होते. प्रतिपादन भागवत कथा वाचक भाई श्री रमेश भाई ओझा यांनी केले.

Mar 19, 2026