चिखली बाजार समिती

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड

Chikhali Bazar Samiti: चिखलील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदात गोपाळदेव सुपेकर ह्यांनाच बिनविरोध निवड झाली. या निवडीत काँग्रेसमधील काही उम्मेदवार नाराज असल्याचे दिसून

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड

Chikhali Bazar Samiti


इच्छुकांमध्ये नाराजी; रामेश्वर जाधव यांचा तालुका काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

चिखली (Chikhali Bazar Samiti) : बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडीत समाधान गोविंदा सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र या निवडीदरम्यान काँग्रेसमधील काही इच्छुकांमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचे दिसून आले असून, तालुका काँग्रेस अध्यक्ष रामेश्वर जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

बाजार समितीच्या (Chikhali Bazar Samiti) शिदोरीगृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी कामकाज पाहिले. दोन संचालक वगळता सर्व संचालक उपस्थित होते. पक्ष नेतृत्वाने सभापतीपदासाठी समाधान सुपेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीचे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर अन्य कोणत्याही उमेदवाराचा अर्ज शिल्लक राहिला नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी समाधान सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

निवडीची घोषणा होताच बाजार समिती परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी पुष्पहार व शाल देऊन नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला. तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची निवड झाल्याने शेतकरी, व्यापारी व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विविध घटकांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सचिव गजानन देवकर, गारोळे साहेब, अनिस पटेल आदींनी सहकार्य केले.

इच्छुकांमध्ये नाराजी
सभापतीपदासाठी एकूण पाच जण इच्छुक असल्याची चर्चा होती. यामध्ये पांडुरंग भुतेकर व समाधान परिहार हे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील असल्याने खरी स्पर्धा कमलबाई विष्णू कुळसुंदर, समाधान सुपेकर आणि रामेश्वर जाधव यांच्यात मानली जात होती. काँग्रेसचे नेते व माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सभापतीपदासाठीचे नाव अखेरच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी समाधान सुपेकर यांच्या नावाची घोषणा होताच काही इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा बाजार समिती परिसरात रंगली. याच पार्श्वभूमीवर रामेश्वर जाधव यांनी तालुका काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समजते.

पदवाटपाच्या सूत्रामुळे संघटनेत नाराजी?
महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सभापती व उपसभापती पदांची संधी देण्याचे सूत्र अवलंबले जात असल्याची चर्चा आहे. सर्व कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या या भूमिकेमुळे काही ठिकाणी मतभेद आणि नाराजी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी उपसभापतीपदाच्या निवडीवेळीही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून किसन लाला धोंडगे यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी इच्छुक असलेले संतोष वाकडे यांना संधी न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता सभापतीपदाच्या निवडीतही नाराजी उफाळून आल्याने बाजार समितीच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निवडीवेळी उपस्थित संचालक
किसन तेजराव धोंडगे, गणेश पुंजाजी थुट्टे, परमेश्वर सखाराम पवार, श्रीकृष्ण सुभाष मिसाळ, पांडुरंग बाजीराव भुतेकर, संतोष शिवाजी वाकडे, समाधान गोविंदा सुपेकर, कमल विष्णू कुळसुंदर, मंदाबाई भुतेकर, रामेश्वर श्रीपत जाधव, संतोष रमेश वानखेडे, रामेश्वर शिवशंकर खेडेकर, मनोज सारंगधर लाहुडकर, समाधान सुखदेव परिहार, संजय सुखदेव गवई आणि राजेश गजानन पवार उपस्थित होते.

संबंधित सामग्री

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’  गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’ गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

बुलढाण्यात संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील वाद पुन्हा पेटला. ‘बुलढाण्याचा बिहार’ टीकेला गायकवाडांनी चिखलीतील आरोपांसह प्रत्युत्तर दिले.

Sep 30, 2026
शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

Buldhana Shiv Sena Akrosh: यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने..

Sep 29, 2026
मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

बुलढाण्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; ‘ट्रिगर-१’ लागू. आमदार चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश.

Sep 26, 2026
कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026