Bullock Theft

परभणीत हात्तलवाडी येथील बैल जोडी गंगाखेडच्या शनिवार बाजारात...!

परभणीच्या मानवत तालुक्यातील हात्तलवाडी येथील शेत आखाड्यावरून शनिवार, ८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चोरीस गेलेली बैल जोडी गंगाखेड शहरातील जनावरांच्या शनिवार बाजारात आढळून आली आहे.

परभणीत हात्तलवाडी येथील बैल जोडी गंगाखेडच्या शनिवार बाजारात...!

Bullock Theft

बैल जोडी चोरी करणाऱ्या दोघांसह पिकअप वाहन ताब्यात...!

परभणीच्या मानवत तालुक्यातील हात्तलवाडी येथील शेत आखाड्यावरून शनिवार, ८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चोरीस गेलेली बैल जोडी गंगाखेड शहरातील जनावरांच्या शनिवार बाजारात आढळून आली आहे. पशुपालक शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी चोरीस गेलेल्या बैल जोडीसह दोघांना पिकअप वाहनासह ताब्यात घेतले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मानवत तालुक्यातील हात्तलवाडी शिवारातील शंकर पंडितराव मोगरे या शेतकऱ्याच्या शेत आखाड्यावर बांधलेली बैलांची जोडी शनिवार, ८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.

शेतकरी शंकर पंडितराव मोगरे हे सकाळी ६ वाजता शेतात आले असता त्यांना आखाड्यावर बांधलेली बैल जोडी दिसली नाही. त्यांनी शेताशेजारील शेतकरी शफिक उस्मान शेख यांच्या आखाड्यावर जाऊन त्यांच्याकडे बैलांबाबत विचारणा केली. त्यानंतर परिसरात पाहणी केली असता बैलांच्या गळ्यातील घागरमाळ बैलगाडीवर अडकविलेली दिसून आली. त्यामुळे बैल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी बैलांच्या पायांच्या खुणांवरून माग काढला. नागरजवळा रस्त्यापर्यंत बैल जोडी आणल्याच्या खुणा तसेच तेथेच पिकअप वाहनाच्या चाकांच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी बैल जोडी पिकअप वाहनात टाकून पोखर्णीमार्गे गंगाखेडकडे नेल्याचा अंदाज शेतकरी शंकर पंडितराव मोगरे यांनी व्यक्त केला.

याबाबत त्यांनी सरपंचांमार्फत मानवत पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर शफिक उस्मान शेख, दत्ता कुंडलिकराव मोगरे व अन्य ग्रामस्थांसोबत त्यांनी गंगाखेड गाठून येथील जनावरांच्या शनिवार बाजारात पाहणी केली. यावेळी चोरीस गेलेली बैल जोडी शनिवार बाजारात आढळून आली.

ही बाब त्यांनी तातडीने गंगाखेड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर रेंगे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बैल जोडीसोबत कार्तिक अर्जुन उक्कलकर, चालक अर्जुन अंकुश क्षिरसागर यांना बोलेरो पिकअप एमएच २० ईएल ७२८२ क्रमांकाच्या वाहनासह गंगाखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यानंतर त्यांना मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशनराव पतंगे, पोह. जावेद शेख, पोशि. चंद्रशेखर कावळे यांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी पुढील कारवाईची प्रक्रिया मानवत पोलीस ठाण्यात सुरू होती.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

Hingoli Suicide-affected farmer: दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून इसापूर-रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे यांनी चार दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

Oct 06, 2026