शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
चाकूर (Chakur Bhik Mago Andolan) : शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चाकूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. २९) चाकूर शहरातील बाजारपेठ परिसरात ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, शेतमजुरांच्या कुटुंबांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा त्वरित मंजूर करावा, चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शेतकरी कुटुंबांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करावा, तसेच चाकूर शहरातील मजुरांसाठी रोजगार हमी योजना सुरू करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर निर्माण झालेल्या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हातात फलक घेऊन कार्यकर्त्यांनी बाजारपेठ परिसरात शासनाच्या धोरणांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या (Chakur Bhik Mago Andolan) आंदोलनातून शासनाने शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक मदत व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.