चाकूर शेतकरी मृत्यू

बस चालकाची घाई ठरली जीवघेणी; शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Chakur Farmer death: बसमध्ये प्रवासी चढत असतानाच चालकाने बस पुढे नेल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या वडवळ नागनाथ येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बस चालकाची घाई ठरली जीवघेणी; शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Chakur Farmer death

 

बस चालकाच्या घाईमुळे कुटुंबाचा आधार हरपला

चाकूर (Chakur Farmer death) : बसमध्ये प्रवासी चढत असतानाच चालकाने बस पुढे नेल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या वडवळ नागनाथ येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबातील कर्त्या व्यक्ती मरण पावल्याने कुटुंबाचा आधार हरपला आहे.

वडवळ नागनाथ येथील प्रदीप बाबुराव मिरकले (वय ५५) हे ८ सप्टेंबर रोजी कर्जाच्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी चाकूर येथे आले होते. दुपारी गावाकडे जाण्यासाठी ते चाकूर बसस्थानकातून अहमदपूरकडून लातूरकडे जाणाऱ्या एमएच १४ एनई ६०८१ क्रमांकाच्या बसमध्ये चढत होते. त्याचवेळी बसचालक आनंद लक्ष्मण जोगपेटे याने बस पुढे नेल्याने मिरकले यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. यावेळी बसचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने पायाचा चेंदामेंदा होऊन अतिरक्तस्त्राव गेल्याने ते गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमी अवस्थेत मिरकले यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबातील कर्त्या व्यक्ती गेला व कुटुंबाचा आधार हिरावला आहे. दरम्यान, (Chakur Farmer death) बसमध्ये प्रवासी चढत असल्याची माहिती असतानाही चालकाने निष्काळजीपणे बस सुरू केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी शिवराज शिवमूर्ती जनगावे (वय ६१, रा. वडवळ, ता. चाकूर) यांनी ९ सप्टेंबर रोजी चाकूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बसचालक आनंद लक्ष्मण जोगपेटे याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४९४/२०२६, कलम २८१, १२५(ब) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसस्थानकात प्रवासी चढत किंवा उतरत असताना बस सुरू करण्याच्या प्रकारांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पूर्ण प्रवासी बस मध्ये चढल्यानंतर बसचे दार बंद केल्यानंतरच गाडी पुढे घेणे जरीही सांगितले जात असले तरीही कंडक्टर व ड्रायव्हरच्या घाईमुळे या गरीब शेतकऱ्याचा जीव गेला असल्याची (Chakur Farmer death) घटना प्रवाशातून बोलली जात आहे तरी परिवहन महामंडळाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चालकांवर नियंत्रण ठेवावे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे. पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार जी. यू. बोळंगे पुढील तपास करीत 

टैग्स: Chakur Farmer death