चिखली वनविभाग

विहीरीत पडलेल्या कोल्हयाला वनविभागाकडून जीवनदान

Chikhli Forest Department: तालुक्यातील मौजे चिखली येथील रमेश चव्हाण यांच्या शेतमधील विहिरीत दि. १० ऑगस्ट रोजी कोल्हा  पडलेल्या अवस्थेत शेतकऱ्याला आढळला.  त्याने ही बाब लगेच वन कर्मचाऱ्यांना माहिती

विहीरीत पडलेल्या कोल्हयाला वनविभागाकडून जीवनदान

Chikhli Forest Department

मानोरा (Chikhli Forest Department) : तालुक्यातील मौजे चिखली येथील रमेश चव्हाण यांच्या शेतमधील विहिरीत दि. १० ऑगस्ट रोजी कोल्हा  पडलेल्या अवस्थेत शेतकऱ्याला आढळला.  त्याने ही बाब लगेच वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता वनविभागाच्या टीमचे कर्मचारी लगेच घटनास्थळी हजर झाले. वनपरीक्षेत्र अधिकारी प्रमोद सानप यांच्या मार्गदर्शनाने कोल्ह्याला  सुखरूप रेस्क्यु करून आदिवासात सोडण्यात आले. कोल्हा विहीरमध्ये  होता. विहीर ३९ फुट खोल असून रविवारी रात्री आपल्या शिकारीचा पाठलाग करता करता तो विहीरमध्ये पडला.

ही (Chikhli Forest Department) बाब शेतकऱ्यांने वनविभागला दिली. तेंव्हा यावेळी वनरक्षक अनिल राठोड यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या टीमसह धाव घेतली व विहीरीमध्ये उतरून सुखरूप कोल्ह्याला बाहेर काढले. यावेळी  गावकऱ्यांनी सर्वातोपरी मदत केली. यावेळी वनपाल सोनोने, शेतकरी रमेश चव्हाण, बाळू राठोड,  वनरक्षक अनिल राठोड, निसर्गमित्र निखील चव्हाण, सुरेश राठोड, अर्जुन राठोड, निलेश राठोड , कबीर राठोड, शुभम राठोड, डोमा पवार , शुभम चव्हाण, कपील जाधव, गोलू पवार, बाबू चव्हाण वन कर्मचारी व गावकरी आदी उपस्थीत होते.