चिखली वीजपुरवठा

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Chikhli Power Supply: चिखली तालुक्यात सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे पिकांना पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. मात्र, महावितरणकडून शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Chikhli Power Supply

 

डॉ. ज्योती शिवशंकर खेडेकर यांच्या नेतृत्वात महावितरणला निवेदन

चिखली (Chikhli Power Supply) : चिखली तालुक्यात सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे पिकांना पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. मात्र, महावितरणकडून शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

​तालुक्यातील काही शिवारामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिवाला बिबट्या, साप, रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांपासून गंभीर धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन दिवसा (Chikhli Power Supply) वीजपुरवठा सुरू न केल्यास शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

​हे निवेदन डॉ. ज्योती शिवशंकर खेडेकर (मा. सदस्या - शिक्षण व क्रीडा, कृषी समिती जिल्हा परिषद, बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण उपविभाग, चिखली येथे सादर करण्यात आले. ​यावेळी तालुकाध्यक्ष बाळूभाऊ पवार, शहराध्यक्ष रवींद्रभाऊ तोडकर, माजी नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे साहेब, संजय सावंत, सोपान भालेकर,  सुरेश शितोळे, भागवत हळदे, शेषराव जाधव, नामदेव भुसारी, प्रसाद पाटील, गणेश देशमुख, विठ्ठल मापारी, वैभव आखाडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टैग्स: Chikhli Power Supply