सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सहकार मंत्री म्हणाले, एवढा दुष्काळ माझ्या आयुष्यात मी कधी बघितला नाही

Minister Babasaheb Patil: एवढा दुष्काळ, माझ्या आयुष्यात मी कधी बघितला नाही. म्हणजे पीक कुठलंच आलं नाही. सोयाबीन गेलय, कापूस गेलाय... उसाचे नुकसान झालंय... पण जी प्रोसिजर असते, एक नियमावली आहे

सहकार मंत्री म्हणाले, एवढा दुष्काळ माझ्या आयुष्यात मी कधी बघितला नाही

Minister Babasaheb Patil

 

दुष्काळ शंभर टक्के जाहीर होणार

लातूर (Minister Babasaheb Patil) : एवढा दुष्काळ, माझ्या आयुष्यात मी कधी बघितला नाही. म्हणजे पीक कुठलंच आलं नाही. सोयाबीन गेलय, कापूस गेलाय... उसाचे नुकसान झालंय... पण जी प्रोसिजर असते, एक नियमावली आहे त्याच्यामुळे ती तारीख केली आहे. दुष्काळ तर जाहीर होणार आहे. एनडीआरएफ प्रमाणे देणारच आहे, शासनच मदत करणार आहे, अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Minister Babasaheb Patil) यांनी दिली.

राज्याचे सहकार मंत्री (Minister Babasaheb Patil) सोमवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमासाठी पुण्यात होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या परिस्थितीत मी अनेक ठिकाणी गेलोय. पाहणी केली. अनेक आमदार, मंत्रीही गेले आहेत. आणि सगळे जात असतात. याबाबत सगळे सतर्क आहेत. दुष्काळ सदृश्य स्थिती म्हणून घोषित केली आहे. पहिल्याच्या प्राथमिक गरजा आहेत त्या लागू केल्या आहेत. विद्यार्थ्यांची फेस, लाईटचे बिल, पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी सरकार करणार आहे, असेही सहकार मंत्री म्हणाले.

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Minister Babasaheb Patil) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर सह विविध भागात भेटी देऊन दुष्काळस दृश्य परिस्थितीचे पाहणी केली होती. शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी जाणून घेतली होती. त्यानंतर सोमवारी ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्रमासाठी पुण्याला रवाना झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील एकंदर परिस्थितीवर हे भाष्य केले.
यावेळी पत्रकारांनी 'दुष्काळ जाहीर होणार आहे का?' असा प्रश्न विचारला असता शंभर टक्के दुष्काळ जाहीर होणार आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.