कोरची नगरपंचायत

अंत्यसंस्कारासाठी ‘कटरा’ही नाही; कोरची नगरपंचायतीचा अमानुष कारभार

Korchi Nagar Panchayat: कोरच्या शहरात स्मशानभूमीची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मृतदेह जाळण्याच्या साधनांचा अभाव असल्याने नागरिकांना कटरा नसल्यामुळे लाकूड रचून विधी

अंत्यसंस्कारासाठी ‘कटरा’ही नाही; कोरची नगरपंचायतीचा अमानुष कारभार

Korchi Nagar Panchayat

 

मृत्यूनंतरही नागरिकांची अवहेलना

कोरची (Korchi Nagar Panchayat) : कोरची शहरातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था दिवसेंदिवस उघड होत असून आता तर मृतदेह जाळण्यासाठी लाकूड रचण्याचा ‘कटरा’ सुद्धा उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायत काळात उभारण्यात आलेला लोखंडी कटरा आज पूर्णपणे जीर्ण होऊन तुटून पडला आहे, मात्र 2015 पासून अस्तित्वात असलेल्या नगरपंचायतीने त्याची साधी दुरुस्तीही केली नाही. यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी नागरिकांना अक्षरशः मातीवरच लाकूड रचून विधी पार पाडावा लागत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी आणि असंवेदनशील परिस्थिती आहे.

स्मशानभूमीत आधीच पाणी, वीज, शेड, स्वच्छता यांचा अभाव आहे. त्यात आता कटऱ्यासारखी मूलभूत सुविधा नसणे म्हणजे प्रशासनाने माणुसकीलाच तिलांजली दिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील क्षणी कुटुंबीयांना अशा अडचणींना सामोरे जावे लागणे म्हणजे दुःखावर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नगरपंचायत (Korchi Nagar Panchayat) विविध विकासकामांचे दावे करत असताना, सर्वात मूलभूत आणि आवश्यक सुविधा असलेल्या स्मशानभूमीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने प्रशासनाची प्राथमिकता काय आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की: तात्काळ नवीन लोखंडी कटरा बसवावा स्मशानभूमीचे संपूर्ण आधुनिकीकरण करावे पाणी, वीज, शेड, स्वच्छता यांची सुविधा द्यावी
अन्यथा, नगरपंचायतीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाईल. मृतदेह जाळण्यासाठी साधा ‘कटरा’ देण्याचीही क्षमता नाही का? नगरपंचायत नेमकी कोणासाठी काम करते? मृत्यूनंतरही नागरिकांचा सन्मान राखला जाणार नाही का?

संबंधित सामग्री

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad: 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

Sep 01, 2026
घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

Chikhali Mayor Andolan: स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी (२३ ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

Aug 23, 2026
रील स्टार नगराध्यक्षांना कचऱ्याचे ढीग दिसेनात का?

रील स्टार नगराध्यक्षांना कचऱ्याचे ढीग दिसेनात का?

Ausa Garbage Crisis: घंटागाडीतून औषध फवारणीचे रील्स टाकणाऱ्या औसा शहराच्या नगराध्यक्षांना शहरात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग दिसत नाहीत का? आता संतप्त सवाल औसेकर करीत आहेत.

Aug 19, 2026
अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

Latur Municipal Shiv Sena: लातूर महापालिका ने शिवसेनाच्या मागण्यांना मान्य करण्याच्या प्रक्रिया सुरू केली. महापालिकेच्या आयुक्तांनी विकास शुल्कचा चक्का, शहरातील सर्विस रोडवर अतिक्रमण

Aug 13, 2026
मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

Dhol Bajao Andolan : शहरातील वाढती अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, बंद पथदिवे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि बंद पडलेल्या उद्यानांच्या प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहर..

Aug 13, 2026