लातूर (Dayanand Shikshan Sanstha) : महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आदर्श शिखर संस्था म्हणून नावारूपास आलेल्या दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीरमण लाहोटी यांची सहाव्यांदा एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ललितभाई शाह, रमेशकुमार राठी व मकरंद सावे यांची निवड झाली. संस्थेच्या सचिवपदाची धुरा रमेश बियाणी यांच्याकडे सोपवण्यात आली असून संयुक्त सचिवपदी विशाल लाहोटी, तर सहाय्यक सचिव म्हणून ॲड. श्रीकांत उटगे व अजिंक्य सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या कोषाध्यक्षपदी संजय बोरा यांची निवड झाली आहे.
संस्थेची पंचवार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन पंचवार्षिक कार्यकारिणीची निवड प्रक्रिया रविवारी, (दि.२३) दयानंद विधी महाविद्यालयाच्या नवीन सभागृहात अत्यंत उत्साही व शांततापूर्ण वातावरणात पार पडली. दयानंद शिक्षण संस्थेने नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. व्यंकट बेद्रे यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली.
संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये डॉ. चेतन सारडा, ॲड. आशिष बाजपाई, दिनेश इन्नानी, . प्रणव शहा, रविंद्र राठी, आशिष अग्रवाल, सतिश मंदाडे, संतोष गिल्डा, हरिकिशन मालु, सुदर्शन भांगडीया, दत्तात्रय लोखंडे, अविनाश परंडेकर, ॲड. माधव इंगळे, सिद्धेश्वर कोरे,विशाल अग्रवाल, अशोक पाटील, कुनाल कोरे, सागर मंत्री व श्री. निर्मलकुमार दर्डा यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. स्वीकृत सदस्य म्हणून . नरेशकुमार पंड्या व डॉ. पद्मावती बियाणी-तोष्णीवाल यांची, तर पदसिद्ध सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय विश्वस्त मंडळात डॉ. सुरेश भट्टड, शशिकांत कोटलवार, बालकिशन बांगड, प्रदिप सोनवणे आणि श्री. नयनकुमार नावंदर यांचा समावेश आहे.
या सभेस संस्थेचे सर्व विश्वस्त, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेचे आभार सचिव मा. रमेश बियाणी यांनी मानले.
विश्वासाला पात्र ठरण्याचे काम करत राहील!
"शिक्षण माणसाला केवळ रोजगार मिळवून देत नाही, तर विवेकी विचार, संस्कार आणि नैतिक जबाबदारीची जाणीव निर्माण करते. दयानंद शिक्षण संस्था वाणिज्य, विज्ञान, कला, क्रीडा, विधी, औषध निर्माण, फॅशन डिझाईन व ॲनिमेशन अशा सर्वच क्षेत्रांत विद्यार्थ्यांना परवडणारे व दर्जेदार शिक्षण देत आहे. समाजातील हितचिंतकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम संस्था यापुढेही सातत्याने करत राहील."
- लक्ष्मीरमण लाहोटी, अध्यक्ष दयानंद शिक्षण संस्था.
दयानंद शिक्षण संस्था
दयानंद शिक्षण संस्था अध्यक्षपदी लक्ष्मीरमण लाहोटी सचिवपदी रमेश बियाणी यांची फेरनिवड
Dayanand Shikshan Sanstha: महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आदर्श शिखर संस्था म्हणून नावारूपास आलेल्या दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीरमण लाहोटी यांची सहाव्यांदा एकमताने निवड
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Dayanand Shikshan Sanstha