हिंगोली फटाका आगीत मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death

हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली भागातील जळीत कांडात मृत्यूची संख्या तीन

हिंगोली (Hingoli firecracker fire Death) : शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये फटाक्याच्या गोदामाला सोमवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत घटनास्थळी दोघांचा मृत्यू झाला होता. अनेकजण जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होता. यामधील हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला. 

अधिक माहिती अशी की, हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली भागात ५ ऑक्टोंबरला बासटवार यांच्या निवासस्थानामध्ये असलेल्या फटाक्याच्या गोदामाला आग लागुन घरमालक विजयकुमार रामकृष्ण बासटवार व आग विझविण्याकरीता गेलेला अविनाश काशिनाथ बांगर (२६) या दोघांचा जागेवरच होरपळून मृत्यू (Hingoli firecracker fire Death) झाला होता. त्यांच्यावर ६ ऑक्टोंबर मंगळवार रोजी शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमध्ये १२ जण जखमी असल्याने त्यांच्यावर हिंगोलीसह लातूर, छत्रपती संभाजीनगर मध्ये उपचार करण्यात येत आहे.

यामधील हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील दिलीप रंगनाथराव दोडके याच्यावर हिंगोलीत उपचार सुरू असताना ६ ऑक्टोंबर मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास प्रकृती गंभीर झाल्याने लातूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना मद्यरात्री १.३० च्या सुमारास दिलीप दोडके यांची प्राणज्योत मालवली. ७ ऑक्टोंबर बुधवार रोजी त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या या मृत्यूमुळे नगर पालिकेसह शहरामध्ये शोककळा पसरली आहे.

मृत्यूची संख्या तीन वर पोहचली आहे. मयत दिलीप दोडके यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. (Hingoli firecracker fire Death) दिलीप दोडके हे सन २००८ मध्ये हिंगोली नगर परिषद अग्निशमन विभागात कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात अनेक ठिकाणी लागलेल्या आगीत त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले होते.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026