फेसबुक बदनामीकारक पोस्ट

​फेसबुकवरील बदनामीकारक पोस्ट भोवणार; माजी सरपंच मनोज लाहुडकर यांच्याविरुद्ध धाड पोलिसांत भाजपची तक्रार

Defamatory Facebook post: मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्याबाबत सोशल मीडियावर (फेसबुक) तथ्यहीन, बदनामीकारक व समाजात द्वेष पसरवणारी पोस्ट प्रसिद्ध केल्याप्रकरणी..

​फेसबुकवरील बदनामीकारक पोस्ट भोवणार; माजी सरपंच मनोज लाहुडकर यांच्याविरुद्ध धाड पोलिसांत भाजपची तक्रार

Defamatory Facebook post


धाड (Defamatory Facebook post) : मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्याबाबत सोशल मीडियावर (फेसबुक) तथ्यहीन, बदनामीकारक व समाजात द्वेष पसरवणारी पोस्ट प्रसिद्ध केल्याप्रकरणी उदयनगरचे माजी सरपंच मनोज लाहुडकर यांच्याविरुद्ध धाड पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी धाड मंडळाचे तालुका अध्यक्ष अनिल बंडू जाधव यांच्या नेतृत्वात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाणेदारांना हे निवेदन दिले असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

​नक्की प्रकरण काय?
​तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी मनोज लाहुडकर यांनी त्यांच्या "मनोज लाहुडकर" या फेसबुक पेजवरून एक जाहीर प्रसिद्धीपत्रक/पोस्ट प्रसिद्ध केली होती. त्या पोस्टमध्ये "सुरज तेजणकर यांच्या आत्महत्येस जबाबदार सतिश काकडे हा महाले दांपत्याचा कट्टर कार्यकर्ता" व "मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांना सहआरोपी करा" असा दिशाभूल करणारा व आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता.

​राजकीय द्वेषातून बदनामीचा प्रयत्न
​तक्रारदार अनिल जाधव यांनी अर्जात नमूद केले आहे की, विद्याधर महाले हे सनदी पदावर कार्यरत असून त्यांची प्रतिमा अत्यंत निष्कलंक, कर्तव्यदक्ष आणि जनतेची सेवा करणारी आहे. मनोज लाहुडकर हा काँग्रेसच्या माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा कार्यकर्ता असून राजकीय पराभवाच्या आणि जिव्हारी लागलेल्या बाबींमुळे ते सतत खोटे व बिनबुडाचे आरोप करत असतात. मयत सुरज तेजणकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस यंत्रणा कायदेशीर व निष्पक्षपणे तपास करत असून संशयित आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. या तपासात महाले यांचा कोणताही हस्तक्षेप नसतानाही, निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी व सामाजिक आणि प्रशासकीय प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी ही खोटी पोस्ट टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

​कठोर कारवाईची आणि डिजिटल पुरावा जप्त करण्याची मागणी
​लाहुडकर यांच्या या कृत्यामुळे समाजात असंतोष, भीती व द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३५६ (बदनामी), कलम ३५३ (१)(२) (अफ़वा पसरवणे) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act), २००० च्या संबंधित कलमांनुसार अजामीनपात्र गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच सदर फेसबुक पोस्ट सायबर सेलच्या मदतीने तात्काळ हटवून डिजिटल पुरावे जप्त करण्याची विनंतीही पोलिसांना करण्यात आली आहे.

​या (Defamatory Facebook post) तक्रार अर्जावर भाजप तालुका अध्यक्ष अनिल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील जाधव, श्रीरंग आण्णा येंडोले, डॉ. नरवाडे, व्हीजेएनटी जिल्हा अध्यक्ष योगेश राजपूत, भाजप नेते सुनील देशमुख, युवा मोर्चा धाड मंडळ प्रदीप टाकसाळ, भाजप नेते विष्णू पाटील वाघ, सरचिटणीस भाजपा धाड मंडळ प्रवीण वाघ, तालुका अध्यक्ष व्यापारी आघाडी  किरण सरोदे, भाजपाचे अध्यक्ष धाड अनिल कुटे, भाजप नेते गणेश बाजी, कार्याध्यक्ष धाड मंडळ विशाल विसपुते, महेंद्र देविदास पिंपळे ,जितेंद्र कल्याणदास जैन, मंगेश देविदास जाधव, विनोद प्रकाश खरात ,दिगंबर जाधव, प्रमोद अवचित राव ताठे, राहुल जगन भोपळे, जानराव सखाराम वाघ ,राजू रामदास पवार ,विजय धोंडीबा वाघ, प्रकाश सुसर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. धाड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

संबंधित सामग्री

ग्रामसभा ठरावाचे अहवाल सादर करताना ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण; अट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

ग्रामसभा ठरावाचे अहवाल सादर करताना ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण; अट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण करून जातीवाचक तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी मानोरा पंचायत समितीच्या शासकीय कार्यालयात घडली.

Aug 25, 2026
Fact Check: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील व्हायरल पत्रामागील सत्य समोर

Fact Check: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील व्हायरल पत्रामागील सत्य समोर

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा दावा करणारे एक पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

Jul 22, 2026
शेतजमिनीच्या वादातून मारहाण; ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली चौघांविरुद्ध गुन्हा

शेतजमिनीच्या वादातून मारहाण; ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली चौघांविरुद्ध गुन्हा

शेतजमिनीच्या वादातून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली.

Jul 04, 2026
वसमतमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त; दोघांना अटक, 1.36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वसमतमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त; दोघांना अटक, 1.36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जिल्ह्यातील वसमत शहरात अन्न व औषध प्रशासन आणि वसमत शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे.

Jun 30, 2026