निरक्षर साक्षरता अभियान

निरक्षर साक्षरता अभियान अंतर्गत परीक्षा, साहेब म्हणयं... शिका ना अ आ ई...

Illiterate Literacy Campaign: धर्मराज प्राथमिक शाळा व विद्यालयात शिक्षणाधिकारी योजना आशिष चव्हाण यांनी साक्षरता परीक्षेची पाहणी केली, 2027 पर्यंत संपुर्ण साक्षरता लक्ष्य.

निरक्षर साक्षरता अभियान अंतर्गत परीक्षा, साहेब म्हणयं... शिका ना अ आ ई...

Illiterate Literacy Campaign

धर्मराज ला शिक्षणाधिकारी योजना यांची भेट

कन्हान (Illiterate Literacy Campaign) : चेहर्‍यावर सुरकुत्या...अन...थरथरत्या हातात पेन अन कागद काहिसे असेच चित्र...आज साक्षरता परिक्षा वर्गातील प्रवेश करताना दिसले...साहेब म्हणयं...शिका ना अ आ ई... 
             
येथील धर्मराज प्राथमिक शाळा व धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान येथे रविवार (दि. २९) शिक्षणा धिकारी (योजना) मा. आशिष चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने साक्षरता परीक्षा वर्गाची पाहणी केली. २०२७ पर्यंत संपुर्ण साक्षरतेचा टप्पा गाठायचा आहे. त्या अनु षंगाने गावागावात शिक्षकांकडे निरक्षर व्यक्तींना कमा ल ज्ञान देउन साक्षर करायचे आहे. धर्मराज प्राथमिक शाळा येथे ८ तर धर्मराज विद्यालय येथे १० असाक्षरां ची नोंद आहे. या (Illiterate Literacy Campaign) सर्व विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

या साक्षर वर्ग परीक्षेत १८ असाक्षर विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी (योजना) मा. आशिष चव्हाण, सहा य्यक योजना अधिकारी नितीन वाघमारे, साधन व्यक्ती नितीन कवडे, प्राथमिक मुख्याध्यापक खिमेश बढिये, माध्यमिक मुख्याध्यापक प्रकाश डुकरे यांनी उपस्थित असाक्षर परीक्षा वर्गाची पाहणी करून उपस्थितांशी संवाद साधला. प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे असे सांगत संपुर्ण शिक्षित भारत निर्माण करण्याचे आवाह न शिक्षणाधिकारी (योजना) मा. आशिष चव्हाण यांनी केले. मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी असाक्षर वर्ग, नियोजन या संदर्भातील माहिती दिली. 
           
यावेळी (Illiterate Literacy Campaign) असाक्षर परिक्षेचे कामकाज पाहणारे उपमुख्याध्यापक मोहन भेलकर, पर्यवेक्षक राजु सिंग राठोड, चित्रलेखा धानफोले, गणेश खोब्रागडे, भिमराव शिंदेमेश्राम, गंगराज यांच्यासह इतर शिक्षकवृंद उप स्थित होते.