डिझेल-पेट्रोल टंचाई आंदोलन स्थगित

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल व पेट्रोल मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.

डिझेल-पेट्रोल टंचाई आंदोलन स्थगित

Diesel Shortage

प्रशासनाचे लेखी आश्वासन; शेतकऱ्यांना तीन दिवसांत मुबलक इंधन पुरवठा करण्याचे पत्र

चिखली (Diesel Shortage) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल व पेट्रोल मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच संतोष भुतेकर व सरपंच सचिन कदम यांनी २५ मे २०२६ रोजी मेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.

या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेत रविवारी (दि. २४ मे) रात्री सुमारे १० वाजता आंदोलनकर्त्या शेतकरी नेत्यांना तहसील कार्यालयात चर्चेसाठी बोलावण्यात आले. यावेळी तहसीलदार सौरभ गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे उपस्थित होते. प्रशासन, महसूल विभाग व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

चर्चेनंतर चिखली तहसीलदार कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी लेखी पत्र देत पुढील तीन दिवसांत तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

तहसील प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल अत्यावश्यक असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच चिखली तालुक्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंपांना शेतीकामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने पुढे असेही स्पष्ट केले की, पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा वाढविण्यात आला असून वाहनधारकांना सुरळीतपणे पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डिझेल वितरणात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यासोबतच, कॅनमध्ये डिझेल नाकारल्यास किंवा शेतकऱ्यांना त्रास दिल्यास संबंधित पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर व लेखी आश्वासनानंतर २५ मे रोजी मेरा फाट्यावर होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा संतोष भुतेकर, सचिन कदम व विनायक सरनाईक यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तत्काळ निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026