जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

Collector Rahul Gupta: पोळा व कर हा सणानिमित्त हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी भरणाऱ्या बैलांच्या मोठ्या यात्रेमुळे वसमत ते नागेशवाडी दरम्यानचा रहदारीचा रस्ता दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश

पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

Collector Rahul Gupta

 

वाहतुकीच्या बदलाबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले आदेश

हिंगोली (Collector Rahul Gupta) : पोळा व कर हा सणानिमित्त हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी भरणाऱ्या बैलांच्या मोठ्या यात्रेमुळे वसमत ते नागेशवाडी दरम्यानचा रहदारीचा रस्ता दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी काढला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून  हा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे 10 सप्टेंबर रोजी पोळा हा सण साजरा करण्यात येणार असून 11 सप्टेंबर रोजी कर हा सण साजरा होणार आहे. या सणानिमित्त पो.स्टे. कुरुंदा हद्दीतील वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 10,000 ते 15,000 बैलगाड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्यासाठी बैलांचे मालक घेऊन येतात.

त्यामुळे वसमत-औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होते. हा रस्ता राज्य महामार्ग असल्याने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. गर्दीत वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कधी आणि कुठला रस्ता बंद?

वसमत ते पांढरे ते नागेशवाडी पर्यंतचा रहदारीचा रस्ता हा 10 सप्टेंबर रोजी पहाटे 00.00 वाजेपासून ते  11 सप्टेंबर रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी हा आदेश लागू केला आहे.

पर्यायी मार्ग कोणता?

1.  नांदेडकडून छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतूक:* नांदेड - वसमत - झिरो फाटा - हट्टा - जवळा बाजार मार्गे नागेशवाडी मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे वळविण्यात येईल.
2.  छत्रपती संभाजीनगर कडून नांदेडकडे जाणारी वाहतूक: नागेशवाडी - जवळा बाजार - हट्टा - झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात आली आहे.

या आदेशाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिद्ध करावी, अशा सूचनाही आदेशामध्ये देण्यात आले आहेत.

टैग्स: Collector Rahul Gupta

संबंधित सामग्री

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाने आणि फोटोचा वापर करून काही अज्ञातांनी सोशल मीडियावर बनावट (फेक) फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sep 22, 2026
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य

Sep 15, 2026
हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीक

Sep 15, 2026
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शाळा व उपकेंद्राची पाहणी

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शाळा व उपकेंद्राची पाहणी

Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील विकासकामे तसेच नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा

Sep 04, 2026