भटक्या कुत्र्यांचा हल्ला

परभणीत तीन वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Stray Dog ​​Attack: परभणी शहरातील जिंतूर कॉलनीत शनिवारी सायंकाळी साडेतीन वर्षीय बालिका चिमुकलीवर एका भटक्या कुत्र्याने गंभीर जखमी करण्याचा हल्ला झाला.

परभणीत तीन वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Stray Dog ​​Attack

 

डोळ्याजवळ, कानाला,इतर ठिकाणी गंभीर दुखापत...!

परभणी (Stray Dog ​​Attack) :  जिंतूर शहरातील बलसा रोड परिसरातील जमीर कॉलनी येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात साडेतीन वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी बालिकेवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलीशा फिरोज खान (वय साडेतीन वर्षे) ही बालिका घरासमोर खेळत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला चढविला. कुत्र्याने बालिकेच्या डोळ्यजवळ, थुडीजवळ तसेच कानाजवळ चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. हल्ल्यामुळे बालिकेच्या चेहऱ्यावर खोल जखमा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.

घटनेनंतर परिसरातील नागरिक व युवकांनी तत्काळ धाव घेत कुत्र्याला दूर हुसकावून लावले आणि जखमी बालिकेला उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. उम्मेकुलसूम खाजा मजीद यांनी बालिकेवर तातडीने प्राथमिक उपचार केले. जखमांचे स्वरूप गंभीर असल्याने पुढील विशेष उपचारासाठी तिला परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक ठिकाणी नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य बाजारपेठ, शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक मैदाने आणि रहिवासी वसाहतींमध्ये कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसून येतात.

यापूर्वीही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या (Stray Dog ​​Attack) घटना घडल्या असून, नगर परिषद प्रशासनाने कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

यापूर्वी एकदाच काही ठिकाणी नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांनवर कारवाई केली त्यानंतर नगर परिषदेला विसर पडला का असा सवाल संतप्त नागरिक करत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026