Drought Situation

दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आ. रोहित पवार सोमवारी जिल्हा दौऱ्यावर

आ. रोहित पवार २१ सप्टेंबरला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून कळमकोंडा येथे दुष्काळी परिस्थिती व करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आ. रोहित पवार सोमवारी जिल्हा दौऱ्यावर

कळमकोंडा (खुर्द) येथे करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव, युवा आमदार रोहितदादा पवार हे सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची आणि पाण्याअभावी करपून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी ते कळमनुरी तालुक्यातील कळमकोंडा (खुर्द) येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि पक्षाचे हिंगोली जिल्हा निरीक्षक पंकज बोराडे उपस्थित राहणार आहेत.

या पाहणी दौऱ्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, युवक आणि विद्यार्थी यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता कळमकोंडा (खुर्द) येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. रवि शिंदे, विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, गणेशराव गडदे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनीष आंग्रे यांच्यासह पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026