वर्धाकरांच्या संघर्षाला यश; १५ एप्रिलपासून नागपूर-मुंबई दुरांतो वर्धा जंक्शनवर थांबणार

वर्धा जिल्ह्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश मिळाले असून १२२८९/१२२९० नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसला वर्धा जंक्शन येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे.

वर्धाकरांच्या संघर्षाला यश; १५ एप्रिलपासून नागपूर-मुंबई दुरांतो वर्धा जंक्शनवर थांबणार

Duronto Express

वर्धा (Duronto Express) : वर्धा जिल्ह्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश मिळाले असून १२२८९/१२२९० नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसला वर्धा जंक्शन येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे. येत्या १५ एप्रिल २०२६ पासून हा थांबा सुरू होणार असून प्रवाशांसाठी आरक्षण सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत हा निर्णय घेतला आहे. यामुळे वर्धा व परिसरातील प्रवाशांना मुंबईसाठी जलद आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.

या थांब्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकजभाऊ भोयर तसेच माजी खासदार रामदास तडस यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. दरम्यान, गाडी क्रमांक १२२९० (नागपूर-मुंबई) साठी वर्धा जंक्शनला स्वतंत्र आरक्षित कोटाही मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 1AC साठी २, 2AC साठी ६, 3AC साठी ६४ आणि स्लीपरसाठी २० बर्थ उपलब्ध असतील. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे अधिक सोपे होणार आहे. या रेल्वे गाडीचे आरक्षण सुरू झाले असून, आरक्षण केंद्रांवर तसेच RailOne या ॲपवर तिकीट विक्री सुरू आहे.

थांबा सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या ZRUCC सदस्य तथा भाजप जिल्हा सचिव प्रणव जोशी यांनी दिली असून, या सुविधेमुळे वर्धा जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित सामग्री

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026
जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा! इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, पेण स्थानकात तीन तासांपासून गाडी उभी

जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा! इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, पेण स्थानकात तीन तासांपासून गाडी उभी

पेण स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेस तीन तासांपासून थांबली आहे. इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Sep 29, 2026
चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी; 497 कोटींचा प्रकल्प, प्रवासी-मालवाहतुकीला मोठा फायदा

चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी; 497 कोटींचा प्रकल्प, प्रवासी-मालवाहतुकीला मोठा फायदा

चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या 10.86 किमी दुपदरीकरणाला मंजुरी. 497 कोटींच्या प्रकल्पामुळे प्रवासी गाड्या आणि मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे.

Sep 18, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका

केंद्रीय मंत्रिमंडळाने सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका उभारण्यास मंजुरी दिली आहे. दिल्ली-मुंबई, कोलकाता-दिल्ली, चेन्नई-कोलकाता आणि मुंबई-चेन्नई मार्गांचाही विस्तार केला जाणार आहे

Sep 09, 2026
मुंबई लोकलमध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी; ठाणे-बदलापूर लोकलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई लोकलमध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी; ठाणे-बदलापूर लोकलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईची लोकल सेवा ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे.

Aug 26, 2026