वीजपडून मुलाचा मृत्यू

वीज पडून ठार झालेल्या मुलाच्या कुटूंबास शासनाकडून चार लाखाची मदत 

Lightning Boy Death: कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बु येथे जूनमध्ये वीजपडून एका मुलाची मृत्यू झाली. त्याचा कुटुंबाला शासनाने चरळ मदत म्हणून चार लाख रुपये देण्यात आले.

वीज पडून ठार झालेल्या मुलाच्या कुटूंबास शासनाकडून चार लाखाची मदत 

Lightning Boy Death

आखाडा बाळापूर (Lightning Boy Death) : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बु येथे जून प्रारंभी वीज पडून एक मुलगा ठार झाला होता तर एक महिला जख्मी झाली होती सदर घटनेत मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटूंबास शासनाकडून चार लाख रूपयांची मदत धनादेश आमदार संतोष बांगर हस्ते वितरीत करण्यात आला. मौजे पिंपरी बु येथील आनंद नागोराव जाधव वय 15  वर्ष या वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या आई वडिलांस चार लाख रुपये शासकीय मदत देण्यात आली.

यावेळी शिवसेना युवा नेते शेवाळा माजी सरपंच अभय पाटील सावंत,  उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुत्ते,तहसीलदार  जीवककुमार कांबळे ,  कळमनुरी नगराध्यक्ष प्रतिनिधी आर. आर. पाटील, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, माजी नगराध्यक्ष सुवर्णा गाभणे, माजी प.स.सदस्य संजय मंदाडे, बाळू पाटील बेंद्रे, ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम व विशाल पतंगे येलकीकर, महसूल सहाय्यक रविंद्र कुमार मस्के व  कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींमध्ये ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची मागणी

कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींमध्ये ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची मागणी

Gram Panchayat OBC Reservation: १०९ ग्रामपंचायतांमध्ये पिक्के ८० जिल्ह्यातील ओबेसी समाजाला २७ टक्के आरक्षित स्थान देण्याची मागणी, महाराष्ट्र विधान सभेच्या कायदे आणि शिफारशीवर अवलंबून

Jun 17, 2026