सिरसम बु. (Mahavitaran Case) : हिंगोली तालुक्यातील खडकद येथील ३३ व ११ के व्ही उपकेंद्र अंतर्गत गावांचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे धरणग्रस्त भागातील शेतकर्यांनी महावितरण च्या कर्मचार्यांना उपकेंद्रात डांबले शेवटी पोलीस प्रशासनाच्या वतीने मध्यस्थी करण्यात आली.
हिंगोली तालुक्यातील ईसापुर धरणामुळे धरणग्रस्त भागातील तिखाडी, गाडीबोरी, सांडस, बोरगाव, पिंपळदरी, गारोळ्याची वाडी, सावरगाव, खडकत या धरणग्रस्त गावासह २५ गावच्या गावांना विद्युत पुरवठा करणारे ३३ व ११ के व्ही खडकद उपकेंद्राचा विद्युत पुरवठा मागील एक महिन्यापासून महावितरणचे अभियंता , कर्मचारी, ऑपरेटर, जनमित्र, लाईनमन व खाजगी कर्मचारी, यांच्या हलगर्जीपणाने व हस्तक्षेपामुळे वारंवार बंद पडत असल्यामुळे या धरणग्रस्त भागातील २५ गावातील शेकडो शेतकर्याचा नागरिकांनी या उपकेंद्रावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला या कर्मचार्यांना एक तास डांबून ठेवल्यामुळे शेवटी पोलीस प्रशासनास पाचारण करावे लागल्यामुळे या संबंधित कर्मचार्यांनी विद्युत पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले पुन्हा जर विद्युत पुरवठा वारंवार खंडित झाला तर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन करण्याचा इशारा या धरणग्रस्त भागातील नागरिकाच्या वतीने देण्यात आला.
या (Mahavitaran Case) धरणग्रस्त भागातील लोकांच्या चांगल्या सुपीक जमिनी धरणामुळे ४० वर्षापूर्वी संपादित झाल्या उर्वरित हलक्या जमिनीची पिके पावसाअभावी वाळून गेली आहेत. व राहिलेली पिके या विद्युत महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे वाळून जात आहेत या लोकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून मोटार पाईपलाईन करण्यात आल्या पण विद्युत महावितरण कर्मचार्यांच्या ढिसाळ कर्तव्यशुन्य कारभारामुळे गेल्या महिन्याभरापासून नियमित विद्युत पुरवठा बंद पडत असल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके धरणात पाणी असतांनाही खडकद उपकेंद्रातील कर्मचार्यांच्या सावळ्या गोंधळामुळे उभे पिकली पिके वाळली म्हणून शेतकर्यांनी उग्र रूप धारण केले शेवटी पोलीस प्रशासनाच्या वतीने मध्यस्थी करून वित्त पुरवठा सुरळीत करण्यात आश्वासन देण्यात आले.
वीज महावितरण प्रकरण
वीज प्रश्नी महावितरणच्या कर्मचार्यांना ग्रामस्थांनी डांबले; पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले
Mahavitaran Case: हिंगोली तालुक्यातील खडकद येथील ३३ व ११ के व्ही उपकेंद्र अंतर्गत गावांचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे धरणग्रस्त भागातील शेतकर्यांनी महावितरण
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Mahavitaran Case
टैग्स:
Mahavitaran Case
संबंधित सामग्री
महावितरणच्या प्रकरणात जबाबदारी असणार्यांना अभय आणि निर्दोषांवर निलंबनाची कारवाई; अनेकांमध्ये नाराजी
Mahavitaran Case: नर्सी या दलित आश्रमातील महावितरण कारखान्यात, काम पूरणासाठी जाहीर केलेल्या ११.5 केव्ही फिडरच्या कामाचे अदायगी करण्यावर आळी आले.
Aug 02, 2026