Electrocution Death

शेळीसाठी पाला आणताना झाडावरच शॉक लागून एकाचा मृत्यू; फांदी मेन लाईनला लागल्याने दुर्दैवी घटना

झरी बुद्रुक येथे शेळीसाठी पाला आणताना फांदी मेन लाईनवर पडल्याने शॉक लागून ४२ वर्षीय अशोक जाधव यांचा जागीच मृत्यू.

शेळीसाठी पाला आणताना झाडावरच शॉक लागून एकाचा मृत्यू; फांदी मेन लाईनला लागल्याने दुर्दैवी घटना

Electrocution Death

चाकूर (Electrocution Death) : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक येथे शेळीसाठी पाला आणण्यासाठी झाडावर चढून फांदी तोडत असताना ती फांदी सब स्टेशनला गेलेल्या मेन लाईनवरील विद्युत तारेवर पडल्याने शॉक लागून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ७ वाजता घडली.

मृत व्यक्तीचे नाव अशोक बाबुराव जाधव (वय ४२) असे आहे. ते शुक्रवारी सकाळी शेळ्यांसाठी पाला आणण्यासाठी गावाजवळील एका झाडावर चढून फांदी तोडत होते. यावेळी तोडलेली फांदी सब स्टेशनला गेलेल्या मेन लाईनवर पडल्याने ओल्या फांदीतून विद्युत प्रवाह प्रवाहित झाला आणि त्यांना जोराचा शॉक बसला. या दुर्घटनेत त्यांचा झाडावरच मृत्यू झाला. काही वेळ त्यांचा मृतदेह झाडावरच लटकलेल्या अवस्थेत होता.

अशोक जाधव हे वडार समाजातील गरीब कुटुंबातील होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अशोक जाधव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या चार अपत्यांपैकी तीन मुले मूकबधिर असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

Latur Matka-Gambling Raid: लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाड..

Oct 01, 2026
हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

Latur Helmet Rule Mandatory: गेल्या महिनाभरात झालेल्या अपघाती मृत्यूच्या आकडेवारीतून लातूर पोलिसांच्या हेल्मेट सक्तीचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. ऑगस्ट मधील ३३ अपघाती मृत्यू

Oct 01, 2026
दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

Latur Double Murder Case: डांगेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात पाच आरोपींना निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 सप्टेंबर 2026 रोजी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावल

Sep 30, 2026