कन्हान चोरी प्रकरण

'तेल गळती'चा बहाणा करून दाम्पत्याला गंडा 

Kanhan Theft Case: एसबीआय बँके समोर अज्ञात चोरट्यांनी 'कारमधुन तेल गळत आहे' असा बहाणा करून एका दाम्पत्याची दिशाभुल करत सुमारे ५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केल्याची घटना

'तेल गळती'चा बहाणा करून दाम्पत्याला गंडा 

Kanhan Theft Case

 

कन्हान मध्ये साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
एसबीआय बँकेसमोर धक्कादायक घटना, अज्ञात दोनी आरोपी कार मधिल पर्स घेऊन पसार

कन्हान (Kanhan Theft Case) : शहरातील महामार्गवरील एसबीआय बँके समोर अज्ञात चोरट्यांनी 'कारमधुन तेल गळत आहे' असा बहाणा करून एका दाम्पत्याची दिशाभुल करत सुमारे ५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केल्याची घटना बुधवार (दि.१५) जुलैला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असुन प्रवाशां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार अतुल राजेंद्रप्रसाद त्रिपाठी वय ३०वर्ष, रा. लवकुश हाऊसिंग सोसायटी, कोराडी रोड, नागपुर हे पत्नी आशा त्रिपाठी यांच्यासह स्वतः च्या एमएच-४९-सीएस-७५०० क्रमांकाच्या कारने मध्यप्रदेशातील सतना येथुन नागपुरकडे येत होते. कन्हान येथील एसबीआय बँकेसमोर रस्त्याच्या कडेला नाश्त्यासाठी ते थांबले होते. नाश्ता करून कारजवळ परतल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने " गाडीमधुन तेल गळत आहे " असे सांगत अतुल त्रिपाठी यांना कारच्या पुढील बाजुस बोलावले. ते बोनट उघडुन पाहत असताना दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने कारमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नीला "तुमचे पती तुम्हाला बाहेर बोलावत आहे. " असे सांगुन बाहेर आणले.

या (Kanhan Theft Case) संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कारमधील सीटवर ठेवलेली पर्स चोरून पलायन केले. सदर पर्समध्ये सुमारे ५ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये रोख, असा एकुण ५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज होता. त्यात सोन्याच्या चेन, अंगठ्या, बाली, टॉप्स आणि मंगळसुत्रा चा समावेश होता. या प्रकरणी अतुल त्रिपाठी यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

बॉयपास रोड व रेल्वे लाईन लगत शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह

बॉयपास रोड व रेल्वे लाईन लगत शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह

Female Dead Body: नागपुरमध्ये खंडाळा शिवारात एका विहिरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. शेतमालकांनी पोलीसास माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले गेले.

Jun 05, 2026