हिंगणघाटच्या महामार्गावर दु:खद घटना;आई-वडिलांसह चिमुकलीचा दुर्दैवी अंत

वर्धा जिल्ह्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाट नजीक आज भीषण अपघाताची घटना घडली.

हिंगणघाटच्या महामार्गावर दु:खद घटना;आई-वडिलांसह चिमुकलीचा दुर्दैवी अंत

वर्धा

वर्धा (Family Accident) :  वर्धा  जिल्ह्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाट नजीक आज भीषण अपघाताची घटना घडली. महामार्गावरील हॉटेल सगुना फॅक्टरीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या 6 वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांची ओळख गजानन वानखेडे (वय 45), पल्लवी वानखेडे (वय 38) आणि आरोही वानखेडे (वय 6, रा. कुर्ला, ता. समुद्रपूर) अशी झाली आहे. वानखेडे कुटुंब सासरवाडीहून हिंगणघाट शहरात कपडे खरेदीसाठी मोपेड दुचाकीने निघाले होते.

प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना हॉटेल सगुना फॅक्टरीजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात गजानन, पल्लवी आणि आरोही हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले.

गंभीर दुखापतीमुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तातडीने रुग्णवाहिका बोलावून तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे मृत झालेली आरोही ही जुळी बहीण होती. तिची दुसरी जुळी बहीण सुदैवाने बचावली असली तरी आई-वडील आणि बहिणीच्या निधनामुळे ती पोरकी झाली आहे.

एका आनंदी कुटुंबाचा क्षणात झालेला अंत पाहून कुर्ला आणि हिंगणघाट परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
गोंदियात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

गोंदियात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

Gondia Accident गोंदिया जिल्ह्यातील नागरा परिसरात भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअपमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर

Sep 08, 2026
रक्षाबंधनाच्या दिवशी भोर कुटुंबावर काळाचा घाला; ट्रकखाली चिरडून बाप-लेकिचा मृत्यू, आई गंभीर

रक्षाबंधनाच्या दिवशी भोर कुटुंबावर काळाचा घाला; ट्रकखाली चिरडून बाप-लेकिचा मृत्यू, आई गंभीर

रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी निघालेल्या भोर कुटुंबाचा प्रवास चाकणजवळील वासुली येथे दुर्दैवी ठरला.

Aug 29, 2026
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

सोशल मीडियावर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे.

Aug 27, 2026