जालना पॅटर्नची बुलढाण्यात अंमलबजावणी करा; अन्यथा शेतकरी आंदोलन उग्र होईल — विनायक सरनाईक

खरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डिझेलसाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.

जालना पॅटर्नची बुलढाण्यात अंमलबजावणी करा; अन्यथा शेतकरी आंदोलन उग्र होईल — विनायक सरनाईक

Farmer Protest

डिझेल टंचाईवरून प्रशासनावर सडकून टीका; कॅनमधून डिझेल देण्याची मागणी

चिखली (Farmer Protest) : खरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डिझेलसाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जालना जिल्ह्यातील धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातही शेतकऱ्यांना अधिकृत कॅन व बॅरलमधून डिझेल देण्याचा निर्णय तातडीने लागू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

सरनाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सत्ताधारी नेते सायकल रॅली काढून डिझेल बचतीचे दिखावे करत आहेत; मात्र प्रत्यक्षात डिझेलअभावी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर शेतात उभे आहेत. पेट्रोल पंपावर तासन्तास रांगेत उभे राहून शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि डिझेल तिन्ही वाया जात आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेजारच्या जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ट्रॅक्टरचे आरसी बुक किंवा अॅग्रिस्टॅक आयडी तपासून अधिकृत कॅन व बॅरलमधून डिझेल देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जालना प्रशासन शेतकऱ्यांसाठी असा निर्णय घेऊ शकते, तर बुलढाणा प्रशासन का घेऊ शकत नाही, असा सवालही सरनाईक यांनी उपस्थित केला.

“फक्त ‘डिझेल मुबलक आहे’ अशा घोषणा करून उपयोग नाही. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष हाल थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच निर्णय घेतला नाही, तर २५ तारखेला होणाऱ्या मोर्चात शेतकऱ्यांचा संताप उफाळून येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, जालना पॅटर्न बुलढाणा जिल्ह्यात लागू होणार का, याकडे आता शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
हळद पिकाचा ‘ट्रिगर’ लागू करून हळद व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा द्या!

हळद पिकाचा ‘ट्रिगर’ लागू करून हळद व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा द्या!

Vinayak Sarnaik: खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने दीर्घ खंड दिल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हळद पिकासाठी लागू असलेल्या हवामान धोक्याच्या निकषांचा व शासन निर्णय

Oct 02, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026