Farmer Suicide

ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

हिंगोलीच्या ईसापूर रमणा येथे ५० वर्षीय शेतकरी विठ्ठल वाढवे यांची आत्महत्या; नापिकी, दुष्काळ, कर्ज आणि मुलीच्या विवाहाची चिंता असल्याची माहिती.

ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer Suicide

हिंगोली तालुक्यातील घटना; नापिकी, कर्ज आणि मुलीच्या विवाहाची चिंता असल्याची माहिती

खानापूर चित्ता : हिंगोली तालुक्यातील ईसापूर रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे (वय ५०) यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडली.

सततची नापिकी, कोरड्या दुष्काळाची झळ, डोक्यावर वाढत चाललेले कर्ज आणि मुलीच्या विवाहाची चिंता या विवंचनेतून शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना ईसापूर रमणा येथे घडली. श्री विसर्जनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने गावावर दुःखाची छाया पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल वाढवे हे पदवीधर होते. पदवीधर असलेले वाढवे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह दोन एकर शेतीच्या उत्पन्नावर करीत होते. मात्र, परिसरातील प्रतिकूल पावसाळी परिस्थिती आणि कोरड्या दुष्काळामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढत गेल्या. त्यातच सावकारी कर्ज आणि बँकेचे कर्ज तसेच घरातील मुलीच्या विवाहाचा प्रश्न त्यांच्या चिंतेत भर घालत होता.

शेतीचे उत्पन्न अपुरे, कर्जाची परतफेड करण्याचा ताण आणि कुटुंबाच्या भवितव्याची चिंता अशा अनेक समस्यांनी ते त्रस्त असल्याचे सांगितले जाते. २५ सप्टेंबर रोजी त्यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे वाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मयत विठ्ठल वाढवे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, त्यापैकी तीन विवाहित असून एक अविवाहित मुलगी, तसेच एक मुलगा असा परिवार आहे.

सदर घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याला कळताच पोलीस ठाण्याचे राहुल घुले, पोलीस उपनिरीक्षक, वगे मॅडम, महिला पोलीस उपनिरीक्षक, बीट अमलदार शंकर गायकवाड, पोलीस कर्मचारी राजू गुठे घटनास्थळी दाखल झाले. गळफास घेतलेल्या मयताचे शव हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे.

संबंधित सामग्री

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

Wildlife Drought: यंदाच्या पावसाच्या लहरीपणामुळे या परिसरालाही दुष्काळाची तीव्र झळ बसली आहे. त्याचा परिणाम केवळ शेतकरी आणि शेतीवरच नव्हे, तर जंगल परिसरातील वानरांसह विविध वन्यप्राणी व पक्ष्यांवरही..

Oct 06, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026