शक्तीपीठ महामार्ग विरोधी समिती

पोलिस बंदोबस्त धुडकावत संतप्त शेतकर्‍यांची पालकमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

Shaktipeeth Highway: बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलिसांचा बंदोबस्त असतानाही शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या पदाधिकार्‍यांनी चक्क बैठकीत प्रवेश करून पालकमंत्र्यासमोर घोषणाबाजी

पोलिस बंदोबस्त धुडकावत संतप्त शेतकर्‍यांची पालकमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

Shaktipeeth Highway

पोलिसांचा निष्काळजीपणा; वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू

हिंगोली (Shaktipeeth Highway) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिपीडीसी सभागृहात आरोग्य विभागाची बैठक पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलिसांचा बंदोबस्त असतानाही शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या पदाधिकार्‍यांनी चक्क बैठकीत प्रवेश करून पालकमंत्र्यासमोर घोषणाबाजी व त्यांच्या आसनाकडे धाव घेतल्याने हे प्रकरण प्रशासनाने गंभीरतेने घेतले असुन याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजते.

१५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिपीडीसी सभागृहात आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह खासदार, आमदार व जिल्ह्यातील वरिष्ठ आणि पोलिस प्रशासनातील अधिकारीही व्यासपिठावर उपस्थित होते. आरोग्य विभागाची बैठक सुरू असताना जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांनी हळूहळू सभागृहात शिरकाव केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच सभागृहामध्ये स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस बंदोबस्त असतानाही त्यांना धुडकारून संतप्त शेतकर्‍यांनी सभागृहात प्रवेश केला.

आरोग्य विभागाच्या बैठकीत काही लोकप्रतिनिधी महत्वाच्या विषयावर चर्चा करीत असताना अचानक शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार्‍या संतप्त शेतकर्‍यांनी शक्तीपीठ महामार्ग कदापिही होऊ दिला जाणार नाही. अशा घोषणा देऊन सभागृह दणाणुन सोडले. अचानक या झालेल्या घोषणा बाजीमुळे उपस्थित पालकमंत्री नरहरी झिरवाळ व लोकप्रतिनिधींही गोंधळून गेले होते. अशा परिस्थितीत आमदार संतोष बांगर व आमदार राजु नवघरे यांनी उभे राहून संतप्त शेतकर्‍यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

परंतु शेतकर्‍यांच्या भावना संतप्त झाल्याने त्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी बसलेल्या व्यासपिठाकडे धाव घेतली. (Shaktipeeth Highway) अचानक शेतकर्‍यांचा आक्रमकपणा दिसून येताच सभागृहात उपस्थित अधिकार्‍यांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे काही जणांच्या छातीचे ठोके वाढले होते. पोलिस बंदोबस्त असतानाही या संतप्त शेतकर्‍यांचा सभागृहात कसा शिरकाव झाला असेच अनेक प्रश्न उपस्थित अधिकारी, कर्मचार्‍यांतून उपस्थित केले जाऊ लागले. अखेर पालकमंत्र्यांना पोलिस बंदोबस्तात सभागृहाबाहेर नेण्यात आले.

एकुणच सभागृहातील परिस्थिती ही चिंतेची होती. आरोग्य विभागाच्या बैठकीत पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी असताना संतप्त शेतकर्‍यांचा शिरकाव हा मात्र विषय चिंतेचा झाला. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणार असल्याचे सुत्राकडून समजते. चौकशी अंती यामध्ये काय निष्पन्न होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sep 27, 2026
दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

फडणवीसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान विजय वडेट्टीवारांनी 31,628 कोटींच्या पॅकेजवर सवाल करत शेतकऱ्यांना किमान 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली.

Sep 23, 2026

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले

सिंदगी येथे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मोजणीला शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध; मोजणी न करताच महसूल विभागाचे पथक परतले.

Sep 22, 2026